Tejashwi Yadav sarkarnama
देश

Bihar Election Results : बिहारमधून धक्कादायक बातमी, तेजस्वी यादव पराभवाच्या छायेत; इतक्या मतांनी पि‍छेहाटीवर

Tejashwi Yadav Bihar Election Results : बिहार विधानसभेत धक्कादायक निकालाची नोंद होण्याची शक्यता असून महागठबंधनचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव हे पराभवाच्या छायेत दिसत आहे.

Roshan More

Tejashwi Yadav News : बिहारमध्ये एनडीएची लाट दिसून येत आहे. दुपारी तीनपर्यंत आलेल्या मतमोजणीमध्ये एनडीए तब्बल 206 जागांवर आघाडीवर दिसत आहे तर, महागठबंधन अवघ्या 28 जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे महागठबंधनचे मुख्यमंत्रि‍पदाचे उमेदवार पदाचे उमेदवार तेजस्वी यादव हे पराभवाच्या छायेत असल्याचे दिसून येत आहे.

राघोपूर मतदारसंघातून तेजस्वी यादव आपल्या राजद पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे सतीश कुमार लढत आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आघाडीवारीनुसार 12 फेरीपर्यंत तेजस्वी यादव हे 4 हजार 883 मतांनी पि‍छेहाटीवर होते. तर, 14 फेरीत सात हजार 800 पिछेहाटीवर होते.

तेजस्वी यांना 12 व्या फेरीपर्यंत 43 हजार 883 मतं मिळाली आहेत. तर, त्यांचे विरोधक सतीश कुमार यांना 48 हजार 453 मतं मिळाली आहे. त्यामुळे कुमार हे चार हजारानी आघाडीवर होते. मात्र, पुढील दोन फेऱ्यांमध्ये तब्बल सात हजाराची आघाडी कुमारयांनी घेतली. दरम्यान, मतमोजणीच्या तब्बल 30 फेऱ्या आहेत. त्यामुळे आणखी 16 फेऱ्या शिल्लक असल्याने या आघाडीमध्ये बदल होऊ शकतो. तेजस्वी यादव यांना पुढील फेऱ्यांमध्ये आघाडी घेण्याची देखील संधी आहे.

भाजप सर्वात मोठा पक्ष

दुपारी तीनपर्यंत हाती आलेल्या कलानुसार 101 जागांवर लढणाऱ्या 95 जागांवर आघाडीवर आहे.तर, त्यांचा मित्रपक्ष जेडीयू हा 84 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे एनडीएमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप ठरतो आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मुख्यमंत्रि‍पदावर दावा केला जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT