Maharashtra model Bihar elections : महाराष्ट्रातील फंडे बिहारमध्ये राबवले गेले, निवडणूक प्रक्रिया निकोप होती का? बाळासाहेब थोरातांचा सवाल

Bihar Election Results Balasaheb Thorat Reacts from Ahilyanagar : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
Balasaheb Thorat reaction
Balasaheb Thorat reactionSarkarnama
Published on
Updated on

Bihar election results : बिहार विधानसभा निवडणुकीचे कलानुसार एनडीए आघातीला स्पष्ट बहुमत दिसत आहे. निकालाचे पडसाद संपूर्ण देशात उमटू लागले आहे. सत्ताधारी विरोधकांवर 'वोट चोरी'च्या मुद्यावर पसरवत असलेल्या 'फेक नॅरेटिव्ह'वर तुटून पडले आहे. बिहारप्रमाणेच महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजय घेऊ, असा विश्वास महाराष्ट्रातील सत्ताधारी व्यक्त करत आहेत. जल्लोष करत आहेत.

यावर विरोधकांनी देखील आता जशास-तसं उत्तर देण्याची भाषा सुरू केली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी, 'महाराष्ट्रातील फंडे बिहारमध्ये वापरले गेले असून, लोकशाहीसाठी अशी निवडणूक प्रक्रिया खरच योग्य आहे का? याची विचार जनतेने केला पाहिजे,' असे म्हटले आहे.

बिहारमध्ये जागा वाटपावरून महागठबंधन आघाडीमध्ये गोंधळ होता, त्यामुळेच हा पराभव झाला का? यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, 'याबाबतीत अखिल भारतीय काँग्रेस (Congress) कमिटीकडून सविस्तर निवेदन केलं जाईल, नेमका काय गोंधळ झाला हे तेच अधिक विस्ताराने सांगू शकतील. परंतु याला सर्वांचं कारण वाटतं की, जे महाराष्ट्रात घडलेलं आहे, तेच बिहारमध्ये घडलेलं दिसत आहे.'

'महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) जे फंडे वापरले गेले, तेच तिथे फंडे वापरले गेले, ही वस्तुस्थिती दिसते आहे. जनतेला सुद्धा विचार करावा लागेल की, आपली लोकशाही निकोप पद्धतीने चालली आहे का? निरोगी आहे का? कोणत्या पद्धतीने आपल्या निवडणुका घेतल्या जातात आणि जिंकल्या जातात याचा विचार जनतेला करावा लागेल, आणि निरोगी लोकशाहीसाठी आम्हाला आमची लढाई कायम ठेवावी लागेल,' असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.  

Balasaheb Thorat reaction
Bihar Election Result 2025 : बिहारमध्ये महागठबंधनची महाराष्ट्रासारखी स्थिती; विरोधी पक्षनेतेपदही मिळताना दमछाक होणार

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधन आघाडीने तिथे निवडणूक लढली. पण काँग्रेसला अपेक्षित असं यश आलेले दिसत नाही. यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, "या पराभवाचं आत्मचिंतन आणि अभ्यास करावा लागेल, याबद्दल दुमतच नाही. परंतु ही आमची लढाई आहे, ती निकोप लोकशाहीसाठी. जय-पराजय हा निवडणूकचा भाग आहे. आपल्या राज्यघटनेनं पक्ष-पक्षांतर, मत-मतांतर दिलेली आहेत, सत्ता दिली विरोधी पक्ष दिला, पक्ष दिले. असे असताना निकोप पद्धतीने ही प्रक्रिया होते का? तर माझं मत असं आहे की, ही प्रक्रिया निकोप पद्धतीने होत नाही. अनेक फंडे वापरले जातात आणि त्यातून सत्ता अशा प्रकारे हासील केली जाते."

Balasaheb Thorat reaction
BJP JDU NDA success : बिहार निवडणुकीत 'एनडीए'च्या यशाची महत्त्वाचे दहा मुद्दे!

बिहार निवडणुकीत महागठबंधनची परिस्थिती महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसारखी झाली आहे. बिहारच्या विधानसभेच्या 243 जागांपैकी एनडीए 206 जागांवर आघाडी घेतली आहे. तर महागठबंधन आघाडी 30 जागांवर आघाडी करताना दिसत आहे. बिहारच्या एनडीएमधील भाजप 95, जेडीयू 82, एलजेपी 20, एचएएम पाच, आरएलएम पक्षाने चार जागांवर आघाडीवर आहे.

महागठबंधन आघाडीतील काँग्रेस तीन, आरजेडी 24 अन् डावे दोन जागांवर आघाडीवर होते. या निकालानुसार विरोधक उमेदवारांचे अनेक ठिकाणी अनामत रक्कम देखील जप्त होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com