Bihar news : बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मधुबनी जिल्ह्यातील एका गावामध्ये मंगळवारी (ता. ३) पोलीस अधिकाऱ्याच्या फायरिंगमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन गावकऱ्यांनाही गोळी लागली आहे. त्यानंतर संतापलेल्या गावकऱ्यांनी रस्त्यावर मृतदेह ठेवत आंदोलन सुरू केले. या घटनेमुळे गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी आनंद शर्मा हे पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी गावात पोहोचले होते. त्यावेळी अनेक महिलांनी त्यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडण्यास सुरूवात केली. काही महिलांचे अश्रू थांबत नव्हते. जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात असतानाच महिला आक्रमक झाल्या.
संतापलेल्या एका महिलेने थेट जिल्हाधिकारी शर्मा यांची कॉलर पकडली. त्यानंतर इतर महिलाही आक्रमक झाल्या. त्यांनी शर्मा यांची कॉलर पकडून त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. कॉलर पकडलेल्या एका महिलेल्या हातात चप्पलही होती. अचानक घडलेल्या या प्रकाराने पोलीस आणि प्रशासनही हादरले.
पोलिसांनी महिलांना बाजूला सारत जिल्हाधिकाऱ्यांना सुरक्षितपणे त्यांच्या गराड्यातून बाहेर काढले. या घटनेमुळे गावातील तणाव आणखी वाढला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्याचप्रमाणे आनंद शर्मा हे स्थानिकांशी संवाद साधत असतानाचा आणखी एक व्हिडिओही समोर आला आहे.
दरम्यान, आनंद शर्मा हे २०१३ च्या तुकडीचे बिहार केडरचे वरिष्ठ अधिकारी आहेत. ते मुळचे उत्तर प्रदेशचे असून त्यांनी बिहारमध्ये अनेक महत्वाच्या पदांचा कार्यभार सांभाळला आहे. ते काही काळ केंद्र सरकारच्या सेवेतही होते. ते ३ जून २०२५ पासून मधुबनीचे जिल्हाधिकारी आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.