Bihar MLC Election Result Sarkarnama
देश

Bihar MLC Election Result : मोठी बातमी ; निवडणूक रणनीतीकार PK यांची राजकारणात एन्ट्री ; विधान परिषदेत खातं उघडलं..

Bihar MLC Election Result 2023 : प्रशांत किशोर यांनी पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अफाक अहमद यांनी बाजी मारली आहे.

सरकारनामा ब्युरो

Bihar MLC Election Result 2023 : बिहार विधान परिषदेच्या पाच जागासाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत भाजप आणि जेडीयू ने प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळाला आहे.

तर सारण शिक्षण मतदारसंघात निवडणुक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या 'जनसुराज्य' ने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदाराचा विजय झाला आहे. या निकालानंतर प्रशांत किशोर हे राजकारणात सक्रीय झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

जेडीयूने कोशी शिक्षक मतदार संघ आणि सारण पदवीधर मतदार संघाची जागा जिंकली आहे. निवडणुकीपूर्वी जेडीयूकडे ५ पैकी ४ जागा होत्या. आता त्यांच्याकडे फक्त दोन जागा राहिल्या आहेत. तर या ठिकाणी भाजप एका जागा पटकावली आहे. याच ठिकाणी प्रशांत किशोर यांनी पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अफाक अहमद यांनी बाजी मारली आहे.

अफाक अहमद यांनी सीपीआचे उमेदवार पुष्कर आनंद यांचा पराभव केला आहे. पुष्कर आनंद हे दिवंगत आमदार केदारनाथ पांडे यांचे सुपुत्र आहेत. या जागेवर यापूर्वी केदारनाथ पांडे विजयी झाले होते. ते बिहार माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष होते.

दुसरीकडे पदवीधर मतदार संघात चार वेळा आमदार झालेले अवधेश नारायण सिंह यांनी अटीतटीच्या लढतीत पुनीत कुमार यांचा पराभव केला आहे. पुनीत कुमार हे आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांचे सुपुत्र असून आमदार सुधाकर सिंह यांचे बंधू आहेत. पुनीत कुमार यापूर्वी कुठलीही निवडणूक लढवली नव्हती.

भाजपने गया शिक्षक मतदार संघाची जागा जिंकली आहे. येथून जीवन कुमार हे विजयी झाले आहेत. पहिले ही जागा जेडीयूकडे होती. जेडीयूने विद्यमान आमदार संजीव श्याम सिंह यांना मैदानात उतरवलं होते. पण त्यांचा पराभव झाला.

कोसी शिक्षक मतदारसंघात जदयूचे संजीव कुमार सिंह यांनी बाजी मारली आहे. ते चौथ्यांदा आमदार झाले आहेत. येथे भाजपच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली आहे. सारण पदवीधर मतदार संघात जेडीयूचे उमेदवार वीरेंद्र नारायण यादव हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या महाचंद्र प्रसाद सिंह यांचा पराभव केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT