Pappu Yadav Sarkarnama
देश

India Pakistan prisoners : 'अमेरिकेला बाप बनू देऊ नका!' बिहारचा 'हा' खासदार भडकला

Pappu Yadav Urges PM Modi After Donald Trump Statement on India-Pakistan Prisoners : खासदार पप्पू यादव यांनी त्यांच्या समाज माध्यमांवर पोस्ट शेअर करत भारतासारख्या महान देशाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोणत्या अधिकारात घोषणा केली? हा भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे.

Pradeep Pendhare

Pappu Yadav Modi appeal : भारत-पाकिस्तानमध्ये युद्धबंदीवर करार झाल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं आहे. या युद्धबंदीचं जगभरातून स्वागत होत असताना, यशस्वी मध्यस्थीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक होत आहे.

बिहारचे खासदार पप्पू यादव यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीवर त्यांच्या समाज माध्यमांवर पोस्ट शेअर करत, 'अमेरिकेला बाप बनू देऊ नका, युद्धबंदी असली पाहिजे, पण ती भारताच्या अटींवर असावी', असे सुनावले आहे. खासदार पप्पू यादव यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील आवाहन केले आहे. खासदार यादव यांची ही पोस्ट वेगानं व्हायरल होत, असून ती चर्चेत आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी समाज माध्यमांवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये यशस्वी मध्यस्थी केल्याचा जगाला सांगण्याचा प्रयत्न केल्याचा दिसतो, असा आरोप पप्पू यादव यांनी केला आहे. पप्पू यादव यांनी पोस्ट शेअर करताना ती त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना रिट्विट केली आहे. "भारतासारख्या महान देशाबाबत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष कोणत्या अधिकारात ही घोषणा करत आहेत? हा भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे", असे म्हटले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारत (India) आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीची घोषणा करणारी पोस्ट शेअर केली होती. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षात भारत आणि पाकिस्तानने तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे, असा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

अमेरिकेच्या मध्यस्थीने हा करार झाला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी ही पोस्ट जगाच्या नजरेत प्रशंसा मिळवण्यासाठी आणि आपले वर्चस्वासाठी केल्याचा म्हटले जात आहे. तत्पूर्वी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी भारत-पाकिस्तान युद्ध संघर्षात अमेरिका कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही, असे म्हटले होते. त्यानंतर लगेचच अमेरिका राष्ट्राध्यक्ष आणि परराष्ट्रमंत्री यांनी हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, पाकिस्तानचे डीजीएमओ यांनी स्वतः भारतीय डीजीएमओंना शनिवारी दुपारी साडेतीन वाजता फोनवर संपर्क करून युद्धबंदीवर चर्चा केल्याची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली. ही युद्ध बंदी भारतीय वेळेनुसार सायंकाळी पाच वाजल्यापासून दोन्ही बाजूंनी सुरू झाली. जमीन, हवाई आणि समुद्रावरील सर्व गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT