Bihar CM announcement LIVE: बिहारच्या राजकारणात मोठा बदल होणार आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजीनामा दिला आहे. नव्या मुख्यमंत्रीपदी सम्राट चौधरी यांचे नाव फायनल झाले आहे. तर उपमुख्यमंत्रीपदाी नितीश कुमार यांचे सुपूत्र निशांत कुमार यांची वर्णी लागणार अशी चर्चा होत असताना निशांत यांनी उपमुख्यमंत्रीपदासाठी नकार दिला आहे.
उद्या (बुधवार) मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरु आहे, शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरु झाली आहे.
उपमुख्यमंत्री पदासाठी निशांत यांना प्रस्ताव दिला होता. त्यांनी नकार दिल्यानंतर सरायरंजनचे आमदार नितीश कुमार यांचे निकटवर्तीय विजय कुमार आणि जेडीयूचे ज्येष्ठ नेते सुपौलचे आमदार बिजेंद्र प्रसाद यादव यांचे नाव फायनल झाल्याची माहिती आहे.
नितीश कुमार हे पहिल्यांदा सात दिवसासाठी मुख्यमंत्री झाले होते, त्यानंतर 2005 पासून ते मुख्यमंत्रीपदावर विराजमान आहेत. उद्या मुख्यमत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होणार आहे. नव्या मंत्रीमंडळात कुणाकुणाचा समावेश असणार याबाबत बिहारच्या राजकारणात चर्चा सुरु आहे. नव्या सरकारमध्ये काही नव्या चेहऱ्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार आहे.
सोमवारी बिहार राज्यपालांच्या सचिवांनी सम्राट चौधरी यांची भेट घेतली होती. लोकभवनात होणाऱ्या शपथ ग्रहण समारंभासंबंधी ही भेट झाली होती. शपथविधी सोहळ्यात कोण-कोण बड्या नेत्यांना सहभागी करायचे याची पूर्ण माहिती घेतली. संभाव्य मंत्र्यांच्या लिस्टबद्दल सम्राट चौधरी यांनी राज्यपालांच्या सचिवांशी चर्चा केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.