

Beed Politics News: मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जाहीर झालेल्या सरपंच पदाच्या निवडीत ही निवड बिनविरोध होईल असा दावा गावकरी आणि देशमुख कुटुंबियांकडून केला जात होता. प्रत्यक्षात मात्र काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अश्विनी देशमुख यांच्यासह पाच जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. माघारीच्या मुदतीपर्यंत कोण कोण अर्ज परत घेणार? यावर सरपंच बिनविरोध निवडला जातो की, मग निवडणूक होणार? हे स्पष्ट होणार आहे.
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी कालपर्यंत एकूण पाच अर्ज दाखल झाले आहेत. यात प्रामुख्याने संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख, स्वरुपानंद विश्वानाथ देशमुख यांचा समावेश आहे. या शिवाय पंजाब देशमुख, करुणा स्वरूपानंद देशमुख यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे सरपंच पदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
दिवंगत संतोष देशमुख यांना श्रद्धांजली म्हणून ही निवड बिनविरोध व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यातील सगळेच नेते प्रयत्नशील आहेत. खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस आदींनी सरपंचपदाची निवड बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. सोनवणे यांनी तर ही निवडणूक बिनविरोधच होणार असा दावा केला आहे.
7 एप्रिलपासून काल 13 एप्रिलपर्यंत एकूण पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. अश्विनी देशमुख यांनी आपला उमदेवारी अर्ज दाखल केल्यानंतर गेल्या निवडणुकीत सरपंचपदासाठी अवघ्या 9 मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांनी निवडणुकीत उडी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या संजीवनी देशमुख यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे.
या अर्जांची छाननी 15 तारखेला होणार असून 17 एप्रिल रोजी उमदेवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार की तिरंगी लढत होणार हे लवकरच स्पष्ट होईल. स्वरुपानंद देशमुख यांनी निवडणूक अर्ज भरतानाच आपण माघार घेणार नाही. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांबद्दल आम्हाला सहानुभूती आहे, पण ती न्यायालयीन लढ्यासाठी, राजकारणासाठी नाही, अशी स्पष्ट भूमिका स्वरुपानंद यांनी घेतली.
गावातील बाहेरचे लोक या निवडणूकीत हस्तक्षेप करत आहेत. गावातील प्रत्येक गटाला विश्वासात घेणे गरजेचे आहे. बिनविरोध निवड करायची असेल तर मला पाठिंबा द्या, मी गेल्या निवडणुकीत फक्त 9 मतांनी पराभूत झालो होतो. संतोष भैय्या देशमुख यांच्या कुटुंबियांनी राजकारणात लक्ष न घालता आरोपींना शिक्षा कशी होईल आणि कुटुंबियांना न्याय कसा मिळेल? यावर लक्ष केंद्रीत करावे, असा सल्लाही दिला होता
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.