Santosh Bangar News: मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली, फोनही उचलत नाहीत; त्यांना घरी बसवा! शिंदेंसमोरच बांगर यांची डरकाळी..

Shiv Sena internal conflict: संतोष बांगर यांनी कोणत्या मंत्र्यांचे नाव घेतले नसल्याने त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता? याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती.
Shiv Sena internal conflict
Shiv Sena internal conflictSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News: लोकसभा-विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांना पक्षाची खरी परिस्थिती काय आहे? हे आता जाणवू लागले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट, नांदेडमध्ये आमदार बालाजी कल्याणकर यांच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये असलेला रोष शिंदे यांच्यासमोर व्यक्त झाला.

हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी तर मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, आमचे फोनही ते उचलत नाहीत, असा आरोप करत त्यांना घरी बसवा, अशी मागणी केली. कार्यकर्त्यांना वेळ न देणारे, उंटावर बसून शेळ्या हाकणारे मंत्री काय कामाचे? असा थेट सवालच त्यांनी केला.

विशेष म्हणजे यावेळी मंत्री गुलाबराव पाटील बांगर यांच्या शेजारीच बसले होते. बांगर यांनी कोणत्या मंत्र्यांचे नाव घेतले नसल्याने त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता? याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती. शिवसेनेच्या तीन जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा आज नांदेड शहरात मेळावा आयोजित करण्यात आला होता.

Shiv Sena internal conflict
Dr. Babasaheb Ambedkar: आंबेडकरांचा वाढदिवस पहिल्यांदा कुठे साजरा झाला होता? हत्तीच्या अंबारीत बाबासाहेबांची प्रतिमा...

या मेळाव्यात हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांना घरचा आहेर दिला. काही मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, ते उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करत आहेत. फोन उचलत नाहीत अशा मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्याची मागणी त्यांनी केली.

हजारो कोटींचा निधी मग नगरसेवक का नाही?

नांदेडमध्ये महापालिका निवडणुकीत शिवसेनेने 40 जागा लढवल्या आणि फक्त तीन जिंकल्या. नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मतदारसंघात साडेतीन हजार कोटींचा निधी खर्च केला, पण तिथे एकही उमेदवार निवडून आला नाही. तुम्ही शब्द दिला, बी फार्म देण्याचे आदेश दिल्यानंतर माझा बी फाॅर्म पावतीसह अशोक चव्हाणांच्या हाती नेऊन दिला, असा आरोप एका पदाधिकाऱ्याने केला.

Shiv Sena internal conflict
Ashok Kharat News: ईडीचा खरातवर मोठा घाव! 13 तास चौकशी, मर्सिडीज जप्त, बँक खाती गोठवली

पक्षाचे नुकसान

श्रीकांत शिंदे यांनीही हजारो कोटींचा निधी दिल्यानंतर जर एकही नगरसेवक त्या भागात निवडून येत नसेल तर जाब विचारला गेला पाहिजे. आमदारांनी कार्यकर्ते, पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन काम केले पाहिजे. पक्ष वाढवण्यासाठी आम्ही निधी देऊन आमदारांना ताकद देतो. पण त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे पक्षाचे नुकसान होणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, अशी तंबी श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com