Patna : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रिमो लालूप्रसाद यादव यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. आरजेडी मधील बड्या नेत्यांना संयुक्त जनता दलामध्ये आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बिहार सरकारमध्ये 15 वर्षे मंत्री राहिलेला नेताय नितीश कुमारांच्या गळाला लागला आहे.
बिहारमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यादरम्यान लालूंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आरजेडीचे महासचिव आणि माजी मंत्री श्याम रजक हे लवकर जेडीयूमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते.
श्याम रजक हे तब्बल 15 वर्षे राज्यात मंत्री होते. सहावेळा आमदार म्हणून निवडून आले आहे. ते मुळचे जेडीयू मधील नेते आहेत. पण 2002 च्या निवडणुकीआधी त्यांनी आरजेडीमध्ये प्रवेश केला होता. मंत्रिपदाचा राजीनामा देऊन त्यांनी पक्ष सोडला होता. परंतू, त्यांना विधानसभेची तिकीट मिळाले नाही. पक्षाने विधान परिषदेतही त्यांना संधी दिली नाही.
आरजेडीमध्ये महासचिव असलेले रजक पक्षात खूष नसल्याची चर्चा अनेक दिवसांपासून आहे. त्यामुळे लवकरच त्यांची घरवापसी होणार असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी नितीश कुमार यांची भेट घेतली होती. तेव्हापासून त्यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली आहे.
रजक हे पुढील महिन्यात जेडीयूमध्ये प्रवेश करू शकतात. पक्षात त्यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. त्यांच्या प्रवेशाने नितीश कुमारांच्या पक्षाती ताकद वाढणार आहे. तर निवडणुकीच्या तोंडावर हा आरजेडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.