Hemant Soren : झारखंड सरकार कोसळणार? चंपई सोरेन भाजपमध्ये गेल्यास कशी असतील गणितं…

Champai Soren BJP Jharkhand : चंपई सोरेन यांनी रविवारी भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत झारखंडमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.
Champai Soren
Champai SorenSarkarnama
Published on
Updated on

Ranchi : झारखंड मुक्ती मोर्चाचे वरिष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी रविवारी पक्षाला मोठा धक्का दिला. पक्षाशी असलेले अनेक दशकांचे नाते तोडत त्यांनी तीन पर्याय खुले असल्याचे जाहीर केले. ते काही आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा आहे. असे झाल्यास झारखंड सरकार कोसळणार का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

झारखंड सरकारची मुदतही पुढील काही महिन्यांत संपत आहे. चंपई सोरेन काही आमदारांना घेऊन पक्षातून बाहेर पडल्यास मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पायउतार व्हावे लागेल का, त्यांच्याकडे किती आमदार राहतील, इंडिया आघाडीचे सरकार टिकणार का, भाजपची भूमिका काय असेल, अशा अनेक प्रश्नांनी डोके वर काढले आहे.

Champai Soren
Siddaramaiah : राज्यपाल विरूध्द मुख्यमंत्री वाद पेटणार; सिध्दरामय्यांचं मोठं पाऊल

काय आहे राज्यातील गणित?

झारखंड विधानसभेतील 81 जागांपैकी आठ जागा रिक्त आहे. सध्या जेएमएमकडे 26, काँग्रेसकडे 16, राष्ट्रीय जनता दलाकडे एक आणि कम्युनिस्ट पक्षाचा एक आमदार इंडिया आघाडी सरकारमध्ये आहे. आघाडीचे सध्या 44 आमदार असून बहुमताचा आकडा 37 एवढा आहे.

तर विरोधी पक्षात असलेल्या भाजपकडे 23 आणि इतर पक्ष व अपक्षांसह सहा आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे एनडीएचे संख्याबळ 29 पर्यंत जाते. सोरेन सरकारकडे बहुमतापेक्षा सात आमदार अधिक आहेत. चंपई सोरेन हे एकटे बाहेर पडले तरी सरकारला काहीच धोका नाही. मात्र, त्यांनी इतर सात आमदारांसह बंड केल्यास हेमंत सोरेन यांचे सरकार कोसळू शकते. अर्थात त्यांचे हे बंड अपात्रतेच्या कात्रीत अडकू शकते. त्यामुळे सध्यातरी सोरेन सरकारला कोणताही धोका नाही.

Champai Soren
Jitan Ram Manjhi on Champai Soren : 'चंपाई दा आप टाइगर थे, टाइगर हैं..' ; म्हणत जीतनराम मांझींनी 'NDA'मध्ये स्वागतही केलं!

चंपई सोरेन यांच्यापुढील पर्याय

चंपई सोरेन यांनी रविवारी एक्सवर एक पोस्ट करत मनातलं सगळं बोलून टाकलं आहे. हेमंत सोरेन जेलमधून सुटल्यापासून काय-काय घडले, ते त्यांनी लिहिले आहे. आपला आत्मसन्मान दुखावल्याची भावना व्यक्त करत त्यांनी आपल्यापुढे आता तीन पर्याय असल्याचे म्हटले आहे.

राजकारणातून संन्यास घेणे, हा पहिला पर्याय असेल. त्यानंतर स्वतंत्र संघटना काढणे किंवा इतर पक्षात प्रवेश करणे असे पर्याय असल्याचे चंपई सोरेन यांनी म्हटले आहे. यातील तिसरा पर्याय ते निवडतील, असा अंदाज आहे. ते सध्या दिल्लीत असून भाजप नेत्यांच्या गाठीभेटी सुरू असल्याची चर्चा आहे. या भेटीतच त्यांच्या राजकारणातील पुढील वाटचालीची दिशी ठरू शकते. पुढील काही दिवसांत त्यांच्या भाजपप्रवेशाची बातमी येऊ शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com