Nishant Kumar JDU entry : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ते लवकरच मुख्यमंत्रिपदही सोडतील. पण त्याआधी आज राज्यात आणखी एक मोठी घडामोड घडली. नितीश कुमार आता माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि दिवंगत रामविलास पासवान यांच्या रांगेत जाऊन बसले आहेत.
नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार हे आजपासून सक्रीय राजकारणात दाखल आहे. वडील नितीश कुमार हे मागील २० वर्षांपासून राज्याचे मुख्यमंत्री आहे. मात्र, निशांत हे सक्रीय राजकारणापासून कायम दूर राहिले. नितीश कुमार यांनीच त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवल्याचे सांगितले जाते. घराणेशाहीला त्यांचा विरोध असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता चित्र बदलले आहे.
राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी निशांत यांना सक्रीय राजकारणात आणले आहे. निशांत यांनी आज संयुक्त जनता दलाच्या प्रदेश कार्यालयात जाऊन प्रमुख नेत्यांच्या उपस्थित पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. विशेष म्हणजे यावेळी खुद्द नितीश कुमार उपस्थित नव्हते. पक्षप्रवेशानंतर निशांत कुमार यांनी घरी जाऊ वडिलांची गळाभेट घेतली.
आजच्या घडामोडीमुळे नितीश कुमार हे आता लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान यांच्या रांगेत जाऊन बसले. यादव यांच्या पत्नीसह दोन्ही पुत्र आणि एक कन्या सध्या सक्रीय राजकारणात आहे. तर पासवान यांचे पुत्र सध्या केंद्रात मंत्री आहेत. नितीश कुमार हे अनेक वर्षे घराणेशाहीपासून दूर राहिले होते. पण आज निशांत कुमार यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांच्याही नावावर घराणेशाहीचा शिक्का पडला आहे.
बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. तर निशांत कुमार यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडू शकते. त्यामुळे अत्यंत घाईघाईत त्यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश झाला. मागील अनेक वर्षांपासून निशांत यांनी राजकारणात यावे, अशी पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र, निशांत यांच्याकडून वारंवार राजकारणात येणार नसल्याचे सांगितले जात होते. आपण धार्मिकतेला पाहून घेतल्याचे त्यांच्याकडून सांगितले जायचे. मात्र, मागील आठवडाभरात बिहारच्या राजकारणाचा चेहरामोहराच बदलून गेला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.