Bihar Politics : Sarkarnama
देश

Bihar Politics : नितीशकुमार अध्यक्ष होताच तेजस्वी यादवांचा ऑस्ट्रेलिया दौरा रद्द; कुरबुरीची चर्चा...

Chetan Zadpe

Bihar News : बिहारमधील 'जनता दल -युनायटेड' (JDU) आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) या दोन प्रमुख सत्ताधारी मित्रपक्षांमध्ये धुसफूस निर्माण झाल्याचे चित्र आहे. याचे कारण म्हणजे राजीव रंजन सिंग उर्फ ​​लालन सिंग यांना हटवून खुद्द मुख्यमंत्री नितीशकुमार 'जेडीयू'च्या पक्षप्रमुखपदी आले आहेत. लालन सिंग यांच्या आरजेडीशी वाढत्या जवळीकीमुळे नीतीश कुमारांनी हे पाऊल उचलले असल्याचे, बिहारच्या राजकारणात चर्चा आहे. इंडिया आघाडीचे नितीशकुमार प्रमुख चेहरा आहेत, अशावेळी आघाडीवर पक्षाचं वर्चस्व राहावे, यासाठीच जेडीयूमध्ये या घडामोडी होत असल्याचे बोलले जात आहे. (Latest Marathi News)

जेडीयूमधील या बदलांनंतर बिहारमधील महाआघाडीच्या दोन प्रमुख मित्रपक्षांमध्ये उघड मतभेदाची नवी चिन्हे दिसू लागली आहेत. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी त्यांचा नियोजित ऑस्ट्रेलिया दौरादेखील रद्द केला आहे. हा दौरा 6 जानेवारीपासून सुरू होणार होता. तेजस्वी यादव यांनी आयआरसीटीसी प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजेरी लावल्यानंतर एका दिवसातच या दौऱ्याची आखणी केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार आरजेडीच्या एका प्रमुख नेत्याने म्हटले, 'राज्याच्या राजकारणातील अनिश्चिततेच्या काळात पक्ष आपल्या प्रमुख नेत्याला देशाबाहेर पाठवून कोणताही धोका पत्करू इच्छित नाही.' तेजस्वी यादव डिसेंबरमध्ये एकूण चार वेळा मुख्यमंत्र्यांसोबत एकाच मंचावर येण्याच्या चार प्रसंगावेळी एकत्र आले नाहीत. हे मित्रपक्षात धुसफूल असल्याची लक्षणं आहेत.

जेडी(यू) नेत्यांनी त्यांच्यासोबत सत्तेत असलेल्या आरजेडीबाबतच्या मतभेदाबद्दल भाष्य केले नाही. लालनसिंग यांना पक्षाध्यक्षपदावरून हटवण्याबबात जेडीयू नेत्यांनी सावध भूमिका घेतली असली तरी, स्वत: लालन सिंह यांनी नितीश कुमार यांच्यासोबत मतभेदाची असल्याच्या चर्चांना फेटाळून लावले आहे. त्यांच्या ३७ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीला कलंकित करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT