Bihar Politics bihar rjd mla ritlal yadav say ramcharit manas masjid rjd jdu aamne ssamne
देश

Bihar Politics : राजकारण पेटलं ; रामचरित्र मानस वरुन RJD अन् JDU यांच्यात जुंपली, मशिदीमध्ये..'

सरकारनामा ब्यूरो

Bihar Politics : राष्ट्रीय जनता दलाच्या आमदाराने रामचरित्र मानस वरुन केलेल्या विधानावरुन बिहारचे राजकारण पेटलं आहे. त्यांच्या या विधानावर भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत.

मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभर भाजपकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. अशाच एका कार्यक्रमात राजदचे आमदार रीतलाल यादव यांनी रामचरित्र मानस वर वादग्रस्त विधान केल्याने ते अडचणीत आले आहे.

मशिदीत रामचरित्र मानस लिहिलं गेलं असे विधान रीतलाल यादव यांनी केले आहे. त्यानंतर बिहारचे राजकारण पेटलं आहे. समाजमाध्यमांवरुन यादव यांच्या निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

हिंदु धर्म संकटात आहे, असे सांगून भारतीय जनता पार्टी मुस्लिम समाजाचा व्देष करीत आहे, पण एका मशिदीमध्ये रामचरित्र मानस लिहिलं गेलं तेव्हा हिंदु धर्म संकटात नव्हता का, असे यादव म्हणाले.

बिहारमध्ये महायुतीचं सरकार आहे. पण सत्तेतील मित्रपक्ष एक दुसऱ्यांवर निशाणा साधत आहेत. यात रीतलाल यादव यांच्या विधानाकडे राष्ट्रीय जनता दलाने दुर्लक्ष केलं आहे.

जनता दल युनायटेडचे प्रवक्ता अभिषेक झा यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींनी धर्माच्या नावावर अशा प्रकारची विधान करणे चुकीचे आहे. आपल्या धर्माच्याबाबत प्रत्येकाला अस्मिता असते. धर्माच्या नावावर चुकीचे विधानं करु नये, असे अभिषेक झा म्हणाले.

भाजप धर्माच्या अस्मितेवर राजकारण करीत आहे, असे त्यांनी नमूद केलं. अभिझेक झा यांच्या प्रतिक्रवरुन राजद आणि जदयू यांच्यात जुंपली आहे. त्यांच्यात या मुद्दांवरुन अंतर्गत चर्चा होण्याची शक्यता आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT