Nitin Deshmukh : शिंदे हे मुख्यमंत्री होणार हे बंडाच्या एक महिना आधीच ठरलं होतं..

Maharashtra Politics : अमित शाह यांना माहिती होतं,
Maharashtra Politics News
Maharashtra Politics News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : "मी मुख्यमंत्री होणार," असे स्वतः एकनाथ शिंदे मला म्हणाले होते, असा धक्कादायक दावा ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी शुक्रवारी केला.

"उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर सहा सात महिन्यांतच सत्तांतराच्या हालचाली सुर झाल्या होत्या. त्याची कुण कुण लागली होती. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार फुटतील याचा अंदाज आला नाही. २० ते २२ आमदार जातील आणि त्याचा सरकारवर काही परिणाम होणार नाही, असं आम्हाला वाटतं होतं, असे देशमुख म्हणाले.  'आवाज कुणाचा' या ठाकरे गटाच्या कार्यक्रमात आमदार नितीन देशमुख आणि आमदार कैलास पाटील यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

Maharashtra Politics News
Supriya Sule On Ajit Pawar: सुप्रियाताई म्हणतात, "अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन,"

"एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार हे बंडाच्या एक महिना आधीच ठरलं होतं. ठाकरे सरकार पाडायचे आहे याची माहिती फक्त देवेंद्र फडणवीस यांना होती. पण शिंदेच मुख्यमंत्री होणार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना माहिती होतं, असा गौप्यस्फोट नितीन देशमुख यांनी केला.

"सत्तातंराचा सापळा दीड दोन वर्षांपासून रचला जात होता.सत्तांतराची कुणकुण लागल्यानंतर कैलास पाटील आणि माझ्यात चर्चा झाली होती. उद्धव ठाकरे यांना हे सर्व कसं सांगायचं हे कळत नव्हतं," असे देशमुख यांनी सांगितले. "अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर यांचा हिंदुत्त्वाशी काहीही संबंध नाही. बाळासाहेबांचा विचार पुढे न्यायचा हा त्यांचा बनाव," असे देशमुख म्हणाले.

Maharashtra Politics News
Sanjay Raut News : जाहिरातकांडावरून लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा हा बनाव ; मयुर शिंदेबाबत राऊतांचे ..

पण मी आणि नितीन देशमुख यांनी ठरवलं..

"काही आमदारांची आधीपासूनच जुळवाजुळव सुरु होती. आपण उद्धव ठाकरेंना तयार करु. आपण भाजपसोबत जाऊ, अशी काही आमदारांची चर्चा सुरु होती. पण मी आणि नितीन देशमुख यांनी ठरवलं होतं की, काहीही झालं तरी उद्धव ठाकरे यांची साथ सोडायची नाही," असे आमदार कैलास पाटील म्हणाले. "जे शिंदे मातोश्री सोबत प्रामाणिक राहिले नाहीत. ते आमच्यासोबत काय प्रामाणिक राहणार," असा सवालही कैलास पाटील यांनी केला.

वरिष्ठ नेतेच सत्तातंराचे मुख्य सुत्रधार

शिवसेनेतील सर्व ज्येष्ठ नेते आधीपासून शिंदे यांच्यासोबत होते. गुलाबराव पाटील सांगतात आम्ही नंतर शिंदे सोबत गेलो. पण तसं नाही. हे सर्व वरिष्ठ नेते आधीपासून संपर्कात होते. आम्ही शेवटी गेलो, असं चित्र त्यांनी दाखवलं. प्रत्यक्षात वरिष्ठ नेतेच सत्तातंराचे मुख्य सुत्रधार होते, असे देशमुख म्हणाले.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com