Narendra Modi Biopic :  Sarkarnama
देश

Narendra Modi Biopic : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींवर पुन्हा बायोपिक? भूमिकेसाठी बीग-बी?

Biopic On Narendra Modi : "मोदींच्या भूमिका बिग बी अमिताभ बच्चन यांनी साकारावी.."

सरकारनामा ब्यूरो

Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर आणखी एक बायोपिक चित्रपटाची तयारी होत आहे. 'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटाच्या निर्मात्या प्रेरणा अरोरा या मोंदींवर चित्रपट बनवण्याची तयारी करत आहेत. या चित्रपटात मोदींच्या भूमिका बिग बी अमिताभ बच्चन (Amitah Bachchan) यांनी साकारावी, अशी अरोरा यांची इच्छा आहे. यामुळे आणखी एक बायोपिक निर्मिती करून निवडणुकीआधीच भाजप आणि मोदींची प्रतिमानिर्मिती प्रयत्न होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी पंतप्रधान मोदींवर बायोपिक बनवण्यात आला आहे. यात अभिनेता विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत होते. यातच मोदींच्या आता आणखी एका बायोपिकची बातमी येत आहे. निर्मात्या प्रेरणा अरोरा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, "मोदींवर मला चित्रपट बनवायचा आहे. मोदी हेच या देशाचे खरे अॅक्शन हिरो आहेत."

नरेंद्र मोदींची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर अरोरा म्हणाल्या की, "मोदींची भूमिका बीग बी अभिताभ बच्चन यांनी साकारावी, अशी इच्छा ही त्यांनी व्यक्त केली. यामुळे आता खरंच मोदींवर आणखी एका चित्रपटाच्या निर्मितीला सुरूवात होऊन, नवा चित्रपट येणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. (Latest Marathi News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT