Local Body Elections sarkarnama
देश

बीजेडीनं घडवला इतिहास; सर्व 30 जिल्हा परिषदांवर फडकवला झेंडा, 21 महिला अध्यक्षपदी

ओडिशामधील सत्ताधारी बिजू जनता दलाने इतिहास घडवला आहे. राज्यातील सर्व 30 जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांमध्ये बीजेडीची सत्ता आली असून 21 परिषदांमध्ये महिला अध्यक्ष बनल्या आहेत.

सरकारनामा ब्युरो

भूवनेश्वर : ओडिशामधील (Odisha) सत्ताधारी बिजू जनता दलाने (BJD) भारतीय राजकारणात इतिहास घडवला आहे. राज्यातील सर्व 30 जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांमध्ये बीजेडीची सत्ता आली असून 21 परिषदांमध्ये महिला अध्यक्ष बनल्या आहेत. महिला आरक्षण नसलेल्या ठिकाणीही पक्षानं महिलांना संधी दिली आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षानं भाजपसह इतर सर्व पक्षांना धूळ चारली आहे. (Local Body Elections)

बीजेडीने 30 पैकी 60 ते 70 टक्के जिल्हा परिषदांमध्ये ओबीसी घटकांतील विजयी उमेदवारांना अध्यक्षपद दिलं आहे. त्यातही सर्वाधिक महिलांचा समावेश आहे. तसेच या अध्यक्षांचे सरासरी वयही 41 एवढे आहे. सरस्वर्ती माझी या सर्वात तरूण अध्यक्ष ठरल्या आहेत. त्या 23 वर्षांच्या असून बीएसस्सी पदवी संपादन केली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये विकासकामांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असतो. (Election News)

बीजेडीचे खासदार पिनाकी मिश्रा यांनी सांगितले की, राज्यात पहिल्यांदाच एकाद्या पक्षाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये सत्ता मिळवली आहे. कदाचित देशात असं पहिल्यांदाच असलं असेल. मुख्यमंत्री नवीन पटनाईक (Naveen Patnaik) यांच्यावरील नागरिकांच्या विश्वासामुळे पक्षाला हा विजय मिळाला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षण असूनही पक्षाने 70 टक्के महिलांना संधी दिली आहे. नवीन पटनाईक यांच्या गंजम जिल्ह्यातही ओबीसी महिलेला अध्यक्ष म्हणून संधी देण्यात आली आहे. राज्यातील 30 पैकी 15 जिल्हा परिषदांचे अध्यक्ष 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. तर 23 अध्यक्ष हे 50 वर्षांखालील आहेत. निवड करण्यात आलेले उमेदवारही उच्चशिक्षित आहेत. 18 जणांचे पदवीपर्यंत शिक्षण घेतले असून 26 जण हे किमान बारावी उत्तीर्ण आहेत.

राज्यात फेब्रुवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत बीजेडीला 852 पैकी तब्बल 766 जागा मिळाल्या आहेत. इतर सर्वच पक्षांचा या निवडणुकीत धुव्वा उडाला. पटनाईक हे मागील अनेक वर्षांपासून राज्यात मुख्यमंत्री असून अजूनही त्यांचा करिष्मा कायम आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT