West Bengal News: केंद्रीय निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालमधील दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांतील 15 मतदान केंद्रांवर 2 मे रोजी फेरमतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्हास्तरीय मतदान केंद्रनिहाय अहवाल आणि तक्रारींची तपासणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. ही सर्व मतदान केंद्रे दक्षिण 24 परगणा जिल्ह्याच्या अंतर्गत येतात.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरू होता. यातच,डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातील फाल्टा भागात मोठा राडा झाल्याचंही समोर आलं होतं. ईव्हीएम मशीनवरील भाजपच्या पर्यायासमोर टेप लावण्यात आल्याची तक्रार भाजपने केली होती. या गंभीर तक्रारीची दखल घेत, निवडणूक आयोगही अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालं होतं. ज्या पोलिंग बूथवर, ईव्हीएमच्या बटणावर टेप आढळून येईल,तेथे फेरमतदान घेतले जाईल, असे पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज अग्रवाल यांनी स्पष्ट केलं होतं.
याचदरम्यान,आता पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील मगराहट पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 11 मतदान केंद्रांवर फेरमतदान होणार आहे.याव्यतिरिक्त,अनेक तक्रारींनंतर डायमंड हार्बर विधानसभा मतदारसंघातील चार मतदान केंद्रांवरही फेरमतदान होणार आहे.
मतदान आणि छाननी दरम्यान झालेल्या गैरप्रकारांच्या तक्रारींच्या आधारे, निवडणुकीची निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे,निवडणूक आयोगाने म्हटले आहे. मग्राहत पश्चिम आणि डायमंड हार्बर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकारी आणि निरीक्षकांच्या अहवालांच्या आधारे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व कायदा,1951 च्या कलम 58(2) अंतर्गत,29 एप्रिल 2026 रोजी या मतदान केंद्रांवर झालेले मतदान अवैध घोषित केले आहे.आयोगाच्या म्हणण्यानुसार, संबंधित मतदान केंद्रांवर 2 मे 2026 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत पुन्हा मतदान घेण्यात येणार आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, "मला असे कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत की, पश्चिम बंगाल विधानसभेच्या 2026 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानासंदर्भात 142-मग्राहत पश्चिम विधानसभा मतदारसंघ आणि 143-डायमंड हार्बर विधानसभा मतदारसंघातील संबंधित निवडणूक अधिकारी आणि निरीक्षकांकडून प्राप्त झालेल्या अहवालांच्या आधारे,आयोग, लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ च्या कलम 58 च्या उप-कलम (2) अन्वये उपरोक्त निवडणुकीसाठी २९ एप्रिल रोजी निवडक मतदान केंद्रांवर झालेले मतदान अवैध असल्याचं म्हटलं आहे.
निवडणूक आयोगानं 15 मतदान केंद्रांवर फेरमतदानाच्या घोषणेसह,इतर मतदारसंघांवरही लक्ष केंद्रित केलं आहे. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, ते अद्याप 144-फाल्टा विधानसभा मतदारसंघाशी संबंधित तक्रारींवरील अहवालाची वाट पाहत आहेत. फाल्टा येथील अहवालातून इतर कोणत्याही मतदान केंद्रांवर फेरमतदान आवश्यक आहे की नाही, हे स्पष्ट होईल. निवडणूक आयोगाची पथके जिल्ह्यांमधील तक्रारी आणि मतदान केंद्रांवरील अहवालांचा सातत्याने आढावा घेत आहेत.
फाल्टा विधानसभा मतदारसंघातील आणखी तीस जागांवर फेरमतदान होऊ शकते. भाजपने असा आरोप केला आहे की, ईव्हीएमच्या बटणांवर त्यांच्या निवडणूक चिन्हांवर लेबल लावून टेप चिकटवण्यात आला होता.
तृणमूल काँग्रेसकडून भाजपचा आरोप फेटाळून लावण्यात आला होता. तसेच "हे तथाकथित 'डायमंड हार्बर मॉडेल' आहे, याच पद्धतीमुळे ममता बॅनर्जी यांचे भाचे, अभिषेक बॅनर्जी यांना त्यांची लोकसभा सीट वाचवण्यात मदत झाली, असेही मालवीय यांनी म्हटलं आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसनं भाजपच्या चिन्हावर टेप लावल्याचा दावा फेटाळून लावला असून, पराभव समोर दिसत असल्याने भाजप विनाकारण गोंधळ घालत असल्याचे म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.