

Ahilyanagar news : महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना एकाच वेळी, भाजपचे अहिल्यानगरचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी डिवचलं.
विधान परिषद निवडणुकीवरून काँग्रेस अन् शिवसेना ठाकरे सेनेला, तर मराठी भाषेच्या मुद्यावरून, मंत्री विखे पाटील यांनी चांगलीच टोलेबाजी केली.
मंत्री विखे पाटील म्हणाले, "महाविकास आघाडी ही महाभकास आघाडी आहे, असे मी मागेच बोललो होतो. फक्त सत्ता मिळविण्याकरिता ही मंडळी एकत्र आली आहे. ज्या हिंदुत्वाच्या (Hindutva) भूमिकेवर लोकांनी शिवसेनेला डोक्यावर घेतले, त्याचं हिंदुत्वाला पायदळी तुडविण्याचे काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने केली. काँग्रेसप्रमाणे आता शिवसेना ठाकरे सेनेची अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे. त्याचा परिणाम विधानपरिषद निवडणुकीत पाहायला मिळत आहे."
विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना (ShivsenaUBT) उद्धव ठाकरे सेना पक्षाचे उमेदवार अंबादास दानवेंना काँग्रेसने अटी आणि शर्तीवर पाठिंबा दिला. मंत्री विखे पाटलांनी, "महाविकास आघाडीवर जोरदार शाब्दिक हल्ला केला. महाविकास आघाडीतील कोणाचीही तत्वाशी बांधिलकी नाही. खरेतर, महाविकास आघाडी नाटक कंपनी आहे. त्यामुळे जशी पब्लिक डिमांड येईल, तसे खेळ मांडायचे व बदलत राहायचे एव्हढेच त्यांचे सुरू आहे."
रिक्षाचालकांना राज्यात होणाऱ्या मराठी सक्तीला सरकारने मुदतवाढ दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सरकारच्या निर्णयाला विरोध करत मुबंईमध्ये फलक लावले. मंत्री विखे पाटील म्हणाले, "रिक्षाचालकांना मराठी सक्तीला कालावधी दिलेला आहे. त्यासाठी फलक आणि आंदोलन करण्याची गरज नाही. मात्र, काही लोकांनी परप्रांतीयाविरोधात राजकारण केले आहे."
मनसेचा हा प्रकार म्हणजे, विरोध वोट बँक करण्याचा प्रकार आहे. आज दुर्दैवाने विरोधकांकडे कोणताच मुद्दा नाही. त्यामुळे निर्णय कोणताही घेतला तरी राजकारणचं ते करणार. कारण, ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यांचं अस्तित्व दिसेनासे झाले आहे. त्यामुळे हे अस्तित्वासाठी धडपड सुरू आहे, अशी टीका मंत्री विखे पाटील यांनी केली.
व्यवसायिक गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मंत्री विखे पाटील यांनी, इराण आणि अमेरिका युद्धामुळे आपोआप परिणाम झालेला आहे. त्यामुळे महागाई व निवडणुकीचा संबंध नाही. महागाईवर नियंत्रण ठेवण्याचे काम सरकार करत आहे. युद्धाच्या परिस्थितीमुळे सरकारला, असे निर्णय घ्यावे लागतात, असे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.