BJP News: भाजपात लवकरच राजकीय भूकंप,सहा टर्म खासदार राहिलेले बडा नेता सपाच्या वाटेवर..; कारणही आलं समोर

BJP Political News: सहा टर्म खासदार आणि 'कैसरगंजचा दबंग' म्हणून ओळख असलेले भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण सिंह पक्ष बदलणार आहेत का? याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.ते लवकरच समाजवादी पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.
Brijbhushan Sinh.jpg
Brijbhushan Sinh.jpgSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh News: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यात टोकाचा वाद झाला होता. या वादाचा परिणाम एकमेकांना आव्हान देण्यापर्यंत पोहोचला होता. यानंतर ब्रिजभूषण सिंह यांच्यावर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ब्रिजभूषण शरण सिंह यांना तिकीट नाकारले होते. लैंगिक शोषणाचे आरोप, महिला कुस्तीपटूंचं आंदोलन यामुळे भाजपनं सिंह यांना उमेदवारीच नाकारली होती. त्यानंतर ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी मोठा विजयही झाला होता. आता यानंतर ब्रिजभूषण सिंह यांनी पक्षालाच गंभीर इशारा दिला आहे.

ब्रिजभूषण सिंह यांनी आता थेट भाजपलाच ललकारलं आहे. ते म्हणाले,जर आमचं पक्षाला ओझं वाटत असेल,तर फक्त म्हणा की,आमची गरज नाही,मग आम्ही पण आमची उपयोग मूल्य दाखवून देऊ असा एकप्रकारे पक्षालाच आव्हान दिलं आहे.या त्यांच्या वक्तव्यानंतर भाजपमध्ये सिंह नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

सहा टर्मच्या खासदार आणि 'कैसरगंजचा दबंग' म्हणून ओळख असलेले भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण सिंह पक्ष बदलणार आहेत का? याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.ते लवकरच समाजवादी पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

अखिलेश यादव यांनी ब्रिजभूषण सिंह यांच्या सपामधील प्रवेशाच्या प्रश्नावर अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, माझे नेते आणि गोंडाचे नेते असं म्हटलं आहे.या त्यांच्या विधानानंतर तर्कवितर्क सुरू झाले. पण सिंह यांच्यासाठी राजकीय बाजू बदलण्याचा निर्णय घेणे सोपे नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Brijbhushan Sinh.jpg
Raj Thackeray news : महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंच्या मनातील खदखद आली बाहेर; म्हणाले, वरती बसलेल्या वरिष्ठांच्या मनात सल...

ब्रिजभूषण सिंह हे सध्या खासदार नसले तरी,उत्तर प्रदेशातील राजकारणात आणि त्यातही गोंडा परिसरात अद्याप मोठा दबदबा असल्याचं दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्यात खटके उडाले होते. या वादानंतर ठाकरेंच्या अयोध्या दौर्यालाही त्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता.

पण आता ब्रिजभूषण सिंह यांच्या नाराजी पाठीमागं निवडणूक न लढवणं,पक्षनेतृत्त्वानं त्यांना साईडलाईन केल्याचं पाहायला मिळत आहे. पण ब्रिजभूषण सिंह यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. एकीकडे सहा टर्म खासदार राहिलेल्या नेत्यानं तसे संकेत देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपला लवकरच धक्का बसण्याची शक्यता आहे.

Brijbhushan Sinh.jpg
Chief Minister news : धक्कादायक : मुख्यंमत्री मद्यप्राशन करून पोहोचले विधानसभेत? सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी व्हिडीओच दाखविला... 

ब्रिजभूषण सिंह गेली कित्येक दशकं भाजपमध्ये आहेत. ते पक्षाकडून सहावेळा खासदार झाले आहेत. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असताना त्यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी गंभीर आरोप केले होते. त्यावेळी मोठा वाद उफाळून आला होता. तेव्हा पक्षानं सिंह यांच्यापासून अंतर राखलं. 2024 च्या निवडणुकीत त्यांचं तिकीट कापण्यात आलं. त्यांच्याऐवजी त्यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना उमेदवारी दिली गेली होती. यानंतर त्यांनी निवडणूकही जिंकली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com