AAP and BJP councilors Sarkarnama
देश

'काश्मीर फाईल्स'वरून शेवटच्या सभेतच नगरसेवकांमध्ये तुफान राडा

जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या व्यथा मांडणाऱ्या दि काश्मिरी फाईल्स या चित्रपटावरून अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या (Kashmiri Pandit) व्यथा मांडणाऱ्या 'दि काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटावरून अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी काश्मिरी पंडितांविषयी केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. बुधवारी भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरावर हल्लाबोल केला. तर पूर्व दिल्ली महापालिकेत आप (AAP) व भाजपच्या नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला.

पूर्व दिल्ली महापालिकेची शेवटची बैठक बुधवारी सुरू असतानाच दोन्ही पक्षांचे नगरसेवक भिडले. यै बैठकीत भाजपच्या नगरसेवकांनी केजरीवालांच्या निषेधाचा प्रस्ताव मांडला. केजरीवाल यांनी काश्मिरी पंडितांची थट्टा केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. त्यामुळे त्यांनी व नगरसेवकांनी माफी मागावी, अशी मागणीही भाजपनं केली. त्यानंतर आपचे नगरसेवक सभागृह नेत्याजवळ जात गोंधळ घालू लागले.

दोन्ही पक्षाचे नगरसेवक आमनेसामने आल्याने गोंधळ वाढत गेला. सभागृहातील मर्यादेचे उल्लंघन करत नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. दोन्हीकडील नगरसेवकांमध्ये यावेळी तुफान राडा झाला. काही नगरसेवकांना मारहाणही केल्याचा आरोप दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी केला आहे. दिल्लीतील तीनही महापालिकांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे या शेवटच्या बैठकीबाबत सर्वच नगरसेवक उत्सुक होते.

दरम्यान, बुधवारी भाजप युवा मोर्चाच्या सुमारे 150-200 कार्यकर्त्यांनी सकाळी 11.30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने सुरू केली. द काश्मीर फाइल्स चित्रपटाबाबत विधानसभेत केजरीवाल यांच्या विधानाविरोधात हे निदर्शने ठेवण्यात आले होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास काही आंदोलक बॅरिकेड तोडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात 70 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला करून तोडफोड केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आज भाजपचे कार्यकर्ते निदर्शने करत होते. भाजपला केजरीवाल यांची हत्या करायची आहे, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला. अरविंद केजरीवाल यांनी काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाची खिल्ली उडवली असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT