Vinod Tawde Rajya Sabha candidature News Sarkarnama
देश

Vinod Tawde News: अखेर विनोद तावडेंना राज्यसभेची उमेदवारी जाहीर; बिहार, चंदीगड, केरळनंतर 'दिल्ली'चं राजकारण गाजवणार

Vinod Tawde Rajya Sabha Candidature News: बिहार जिंकण्यासाठी तावडेंची रणनीती यशस्वी ठरली होती. या निवडणुकीत एनडीएने २०० हून अधिक जागांवर आघाडी मिळवली. यात भाजपला सर्वाधिक ८९ जागा मिळाल्या होत्या.

Mangesh Mahale

BJP leader Vinod Tawde Delhi Politics Entry: भाजपने विनोद तावडे यांच्यासह आरपीआय (आठवले) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, माया चिंतामन ईवनाते आणि रामराव वडकुते यांचीही नावे राज्यसभा निवडणुकीसाठी जाहीर केली आहेत. विनोद तावडेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते आता थेट बिहार, चंदीगड, केरळनंतर राजधानी दिल्लीचे राजकारण गाजवणार हे निश्चित झाले आहे.

पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावणारे विनोद तावडे यांना ठरल्याप्रमाणे राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय झाला आहे. मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) प्रमुख रामदास आठवले यांच्यावर भाजपने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.

बिहारमध्ये चौख कामगिरी

बिहारमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला, यांचे श्रेय भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांना जाते, कारण ते बिहारचे प्रभारी होते. बिहार जिंकण्यासाठी तावडेंची रणनीती यशस्वी ठरली होती. या निवडणुकीत एनडीएने २०० हून अधिक जागांवर आघाडी मिळवली. यात भाजपला सर्वाधिक ८९ जागा मिळाल्या होत्या.

राज्यातील विधानसभेच्या सध्याच्या संख्याबळानुसार, राज्यसभेच्या सात जागांपैकी भाजपचे चार उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. उर्वरित जागांवर शिवसेनेच्या वतीने माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार गुरुवारी अर्ज दाखल करतील.

उद्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 7 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. भाजपने त्यापैकी 4 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. युतीचे समीकरण काय आहे. महायुतीमधील उर्वरित जागांवर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 1 उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी मतदान 16 मार्च 2026 रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2026 आहे.

विनोद तावडे यांची राजकीय कारकिर्द

• हरियाणा प्रदेश प्रभारी तसेच बिहार प्रदेश प्रभारी म्हणून काम.

◦ हरियाणामध्ये भाजपची यशस्वी सरकार स्थापना.

◦ बिहारमध्ये राजद-जदयू सरकार बदलून एनडीए सरकार स्थापनेत सक्रिय सहभाग.

◦ बिहार विधानसभा निवडणुकीत प्रभावी नियोजन करून सरकार स्थापनेत भूमिका.

• चंदीगड महानगरपालिकेतील महापौर निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून जबाबदारी – सलग पाच वर्षे भाजपचा महापौर निवडून येण्यासाठी यशस्वी नियोजन.

• संघटन पर्व 2024 राष्ट्रीय सदस्यता अभियान प्रमुख – 15 दिवसांत 5 कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीचे लक्ष्य पूर्ण करण्यात यश.

• उत्तर प्रदेशातील संघटनात्मक निवडणुकीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

• 2024 लोकसभा निवडणुकीत ‘बी’ कॅटेगरी लोकसभा क्षेत्रासाठी लोकसभा प्रवास योजनेचे प्रमुख म्हणून जबाबदारी.

• त्रिपुरा व राजस्थान मुख्यमंत्री निवडीसाठी निरीक्षक म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

• उत्तर प्रदेश, छत्तीसगड इत्यादी राज्यांमध्ये मंत्री परिषद अवलोकनाची जबाबदारी पार पाडली.

• ‘मन की बात’, ‘हर घर तिरंगा यात्रा’, ‘चंद्रयान अभियान’, ‘मेरी माटी मेरा देश’ अशा अनेक राष्ट्रीय स्तरावरील अभियानांमध्ये राष्ट्रीय संयोजक म्हणून जबाबदारी पार पाडली.

• ऑपरेशन गंगा (युक्रेन युद्ध परिस्थितीत अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी) यामध्ये सक्रिय प्रयत्न व त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद.

• प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री अन्न कल्याण योजना, प्रधानमंत्री स्वामित्व योजना यांसारख्या शासकीय योजनांच्या राष्ट्रीय अंमलबजावणीची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली.

• गुजरात, पश्चिम बंगाल, कर्नाटक, उत्तराखंड, दिल्ली या राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण केली.

• राष्ट्रपती निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी – एनडीए व मित्र पक्षांशी समन्वय साधून सर्व राज्यांतील बैठकींना उपस्थिती व यशस्वी नियोजन.

• उपराष्ट्रपती निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी – एनडीए व मित्र पक्षांचे समर्थन मिळविण्यासाठी प्रभावी समन्वय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT