Israel US Iran War
Israel US Iran WarSarkarnama

Israel US Iran War: इराणमध्ये पहिल्यांदाच असं घडलं! खामेनेईंचे सुपुत्र मोजतबा हुसैनी बनले सुप्रीम लीडर; कशी झाली निवड?

Mojtaba Hosseini Becomes Iran’s New Supreme Leader:खामेनेई यांचा मोठा मुलगा मोजतबा हुसैनी यांची सुप्रीम लीडर म्हणून निवड केली आहे. इराणमध्ये विशेष बैठक घेऊन खामेनेई यांच्या उत्तराधिकारी यांची निवड करण्यात आली.
Published on

इस्त्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर इराणला आता नवा नेता मिळाला आहे. अयातुल्ला खामेनेई यांचे सुपुत्र मोजतबा हुसैनी खामेनेई (Mojtaba Hosseini Khamenei) यांना इराणी जनतेने आपला नेता म्हणून निवड केली आहे.

अयातुल्ला खामेनेई यांचा मोठा मुलगा मोजतबा हुसैनी यांची सुप्रीम लीडर म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती इस्त्रायलमधील माध्यमांनी दिली आहे.

सुमारे 36 वर्ष इराणवर सत्ता गाजवणाऱ्या अयातुल्ला अली खामेनेई यांचा अमेरिका-इस्त्रायल हल्ल्यात 24 तासात गेम केला. खामेनेई हे आपल्या घरात असताना हा हल्ला झाला. यात त्यांच्यासह मुलगी, जावाई, नात यांचाही मृत्यू झाला. त्यांची पत्नी मंसूरेह खोजास्तेह बघेरजादेह यांचाही मृत्यू झाला आहे.

इराणमधील सुप्रीम लीडर अशी ओळख असलेल्या खामेनेई यांनी परदेशी निती, लष्कर, आणि धार्मिक मुद्दे यावर मजबूतपण नियंत्रण ठेवले होते. त्यानंतर आता खामेनेई यांचा मोठा मुलगा मोजतबा हुसैनी यांची सुप्रीम लीडर म्हणून निवड केली आहे. इराणमध्ये विशेष बैठक घेऊन खामेनेई यांच्या उत्तराधिकारी यांची निवड करण्यात आली.

इस्लामी गणराज्य यंत्रणेत इराणमधील सर्वात शक्तीशाली हे पद मानले जाते. इराण रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या दबावाखाली मोजतबा यांची निवड झाली आहे.पण याबाबत इराण सरकारकडून कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही.

खामेनेई यांच्या निधनानंतर देशात अंतरिम सरकारची स्थापना करण्यात आली आहे. यात राष्ट्रपती, न्यायाधीश आणि गार्जियन यांचा एका सदस्यांचा समावेश आहे. 8 सप्टेंबर 1969 रोजी जन्मलेले मोतबा हे शिया धर्मगुरु आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पदद्यामागून सुरक्षा मुद्दांवरुन सक्रिय आहेत.

Israel US Iran War
Vishakha Subehdar News : 'माझ्या मुलाला परत आणा...' मराठी अभिनेत्रीची मोदी-फडणवीसांना आर्त साद; व्हिडिओ शेअर

मोतबा यांचे इस्लामिक रिवॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) आणि बसिज मिलिशिया यांच्यासोबत घनिष्ठ सबंध आहेत. अनेक वर्षांपासून आपल्या वडीलांचे संभावित उत्तराधिकारी मानले जात होते. पण इराणच्या क्रांती सिद्दांतानुसार राजवंशीय उत्तराधिकाऱ्याला गैर इस्लामी मानले जाते. त्यामुळे निवड वादग्रस्त ठरत आहेत.

Israel US Iran War
Iran–Israel War News: एक चूक अन् जीवाशी मुकले खामेनेई! 'मोसाद'ने केला गेम ; AI चा वापर

अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर देशात मोठे संकट निर्माण झाले होते. 88 सदस्य असलेल्या धार्मिक संस्थेने घाईत विशेष तज्ज्ञांची बैठक बोलवण्यात आली या निर्णय IRGCयांच्या दबावाखाली घेण्यात आला. इराणच्या इतिहासात पहिल्यांदाच इराणच्या सुप्रीम लीडरपदी वडीलांच्या मुत्यूनंतर मुलाला त्यांच्या जागी नेमण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com