

Deepa Bhati Success Story in Marathi: यशस्वी व्हायचं असेल तर तुमचं वय कधीच अडचण ठरु शकत नाही, फक्त जिद्द हवी असते, हे करुन दाखवलं आहे. दीपा भाटी यांनी. 40 वर्षीय गृहीणी असलेल्या दीपा या तीन मुलांच्या आई आहेत. 18 वर्षांचा सुखी-संसार केल्यानंतर वयाच्या 40 व्या वर्षी त्यांनी उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या (UPPCS) परिक्षेत यश मिळवले आहे.
तीन मुलांची आई असतानाही त्यांनी आपल्या स्वप्नाचा पाठलाग सोडला नाही. कठोर संघर्ष, अभ्यासात सातत्य यामुळे त्यांनी अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यांच्या प्रेरणादायी यशाची माहिती जाणून घेऊया!
"आता हे काय शिकण्याचे वय आहे ? "मुलांकडे लक्ष द्या, पुस्तकांकडे नाही," असे सल्ले महिलांना नेहमीच देण्यात येतात. पण याकडे दुर्लक्ष करीत दीपा यांनी युपीएससी परिक्षा देऊन यशाचे शिखर गाठलं अन् त्या अधिकारी झाल्या.
एका मुलाखती दीपा भाटी यांनी आपल्या संघर्षांची कहाणी सांगितली. चाळीशीत अभ्यास करताना पाहून आजूबाजूच्या लोकांनी अनेक टोमणे मारले. "आता काय साहेबीण होणार का? असे अनेक प्रश्न मला विचारले जात होते. पण मी याकडे दुर्लक्ष करीत माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे मला हे यश मिळवता आले, असे त्या म्हणाल्या.
लहान वयातच दीपा यांचे लग्न झाले होते. संसाराचा गाडा हाकताना पाहिलेले स्वप्न शांत बसू देत नव्हते. संसार करताना त्यांनी अनेक संकटाशी मुकाबला केला. दरम्यान त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले होते. पण ध्येय गाठण्यासाठी त्यांनी परिस्थितीशी दोन हात करीत अभ्यास सुरुच ठेवला.
घराचे काम, तीन लहान मुलांची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली होती. दीपा भाटी या मूळच्या गौतम बुद्ध नगर (नोएडा) येथील कोंडली बांगर या छोट्याशा गावातील असून त्यांचे सुरुवातीचे शिक्षण केंद्रीय विद्यालयात झाले. त्यांनी केमिस्ट्रीमध्ये पदवी आणि इतिहास विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
जेव्हा परीक्षेचा निकाल लागला, तेव्हा संपूर्ण गावाला आश्चर्य वाटलं. दीपा भाटी यांनी 166 वी रँक मिळवून पीसीएस (PCS) अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. निकालानंतर त्या अधिकारी झाल्या, त्या वेळी त्यांची मोठी मुलगी बारावीत शिकत होती.
स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतंही वय नसतं. तुमच्याकडे जर संयम आणि मेहनत करण्याची तयारी असेल, तर यश स्वतः रस्ता बनवून देतं, असे दीपा म्हणाल्या. ज्या संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळत स्वतःची ओळख निर्माण करू इच्छितात त्या महिलांसाठी दीपा यांची सक्सेस स्टोरी प्रेरणादायी ठरेल!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.