PM Narendra Modi and Mamata Banerjee Sarkarnama
देश

BJP strategy West Bengal: ममतादीदींना घेरण्यासाठी भाजपचं 'बिहार मॉडेल'; 7 नेत्यांवर मोठी जबाबदारी

BJP vs TMC West Bengal Election: पहिल्या टप्प्यात पक्षसंघटनेत सक्रिय असलेल्या सात नेत्यांना पश्चिम बंगालमध्ये पाठविण्यात आले असून यातील पाच 5 नेत्यांची लोकसभा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Mangesh Mahale

West Bengal assembly election 2026: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी 'बिहार मॉडेल' राबवणार आहे. त्याची सुरुवात झाली आहे, पहिल्या टप्प्यात पक्षसंघटनेत सक्रिय असलेल्या सात नेत्यांना पश्चिम बंगालमध्ये पाठविण्यात आले असून यातील पाच 5 नेत्यांची लोकसभा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी बंगालचे प्रभारी आणि आरोग्य आणि न्याय मंत्री मंगल पांडेय यांच्या नेतृत्वाखाली अनुभवी नेत्यांवर पक्षसंघटन, पक्षविस्तारासाठी पश्चिम बंगालमध्ये पाठविण्यात आले आहे. संघटन कौशल्य, बूथ कार्यकर्ता, मतदारांशी संवाद, त्यासाठी जुळवाजुळव यासाठी हे सात नेते कामाला लागले आहेत.

कोणत्या 7 नेत्यांवर जबाबदारी

महामंत्री राजेश वर्मा, माजी प्रदेश महामंत्री सुशील चौधरी, किसान मोर्चाचे माजी प्रदेश अध्यक्ष अखिलेश सिंह, माजी प्रदेश महामंत्री जगन्नाथ ठाकुर, माजी मंत्री रामसूरत राय, माजी आमदार मिथिलेश कुमार, माजी आमदार निक्की हेंब्रम आणि विधान परिषदेचे आमदार व सिक्किमचे प्रदेश प्रभारी देवेश कुमार यांचा समावेश आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने संघटनात्मक पातळीवर केलेले कामाला यश आले होते. पश्चिम बंगालशी कनेक्ट असलेल्या पाच नेत्यांना पश्चिम बंगालमध्ये लोकसभा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बंगाल जिंकण्यासाठी भाजप पुर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपने आपली मोहर उमटवली आहे. पण सतत संघटनात्मक कामासाठी कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर या नेत्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.

आक्रमक रणनीती

भाजपला २०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लक्षणीय यश मिळाले होते. त्या निवडणुकीत भाजपने ७७ जागांवर विजय मिळवला होता. भाजपला ३८.१५ टक्के मते मिळाली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करता येऊ शकेल, असा विश्वास भाजपला आहे. याचमुळे निवडणुकीला काही महिने शिल्लक असतानाच भाजपने पश्चिम बंगालमध्ये आक्रमक रणनीतीची अंमलबजावणी सुरु केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT