BJP Sarkarnama
देश

Assam Rajya Sabha By-Election : आसाममधील राज्यसभेच्या दोन्ही जागांवर भाजपच्या उमेदवारांचा बिनविरोध विजय!

BJP Candidate Wins in Assam Rajya Sabha By-Election : माजी केंद्रीयमंत्री तेली आणि उत्तरी करीमगंज येथून चारवेळा आमदार राहिलेले दास यांनी 21ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

Mayur Ratnaparkhe

Assam Political News : आसामची सत्ताधारी पार्टी भाजपने राज्यसभेच्या दोन्ही जागांवर विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही जागा निवडणूक न लढवताच भाजपच्या पदरात पडल्या आहेत.

सोमवार उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अशावेळी राज्यात होणाऱ्या राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून दोनच उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे हे दोन्ही उमेदवारी बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले.

मागील आठवड्यात उमेदवारी अर्ज दाखल करणारे भाजपचे(BJP) दोन्ही उमेदवार, रामेश्वर तेली आणि मिशन रंजन दास यांना गुवाहाटी येथे रिटर्निंग ऑफिसर राजीब भट्टाचार्य यांनी त्यांचे प्रमाणपत्र सुपूर्द केले.

भट्टाचार्य यांनी याप्रकरणी म्हटले की, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ ते दोनच उमेदवार होते. तेली आणि दास यांना विना अडथळा विजेता घोषित केले गेले आणि त्यांची प्रमाणपत्र सोपवली गेली.

माजी केंद्रीयमंत्री तेली आणि उत्तरी करीमगंज येथून चारवेळा आमदार राहिलेले दास यांनी 21ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. माजी केंद्रीयमंत्री तेली यांनीही पक्ष नेतृत्वाचे आभार व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, मला संसदेत राहण्याचा अनुभव आहे आणि एक मंत्री म्हणूनही आहे. तर दास यांनाही विधानसभेत मोठा अनुभव असून, ते पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. आम्हाला विश्वास आहे की राज्यसभेत प्रासंगिक मुद्दे उपस्थित करण्यात सक्षम ठरतील.

लोकसभा(Loksabah Election) निवडणुकीत माजी केंद्रीयमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या दिब्रूगड जागेवरून कामाख्या प्रसाद तासा यांच्या काजीरंगा जागेवरून विजयी झाल्यानंतर भाजपच्या ताब्यातील राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT