BJP Star Campaigner List : जम्मू-काश्मीर निवडणुकीसाठी भाजपची 40 'स्टार' प्रचारकांची यादी जाहीर!

Jammu and Kashmir Assembly Election : मतदानाच्या तारखा 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर अशा असून ४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
BJP
BJP Sarkarnama
Published on
Updated on

BJP and Jammu and Kashmir Vidhan Sabha Election : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यासाठी प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांच्या नावांचीही घोषणा यादी प्रसिद्ध करून करत आहे. याच दरम्यान आज भाजपने आपल्या १५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. याशिवाय आता भाजपने पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केली आहे.

या यादीत समावेश असणारा प्रत्येक नेता जम्मू-काश्मीर विधानसभा(Jammu and Kashmir Vidhan Sabha ) निवडणुकीत भाजपकडून जाहीर झालेल्या उमेदवारांसाठी निवडणूक प्रचार करेल. जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडणार आहे.

BJP
Assembly Election 2024 : भाजपवर नामुष्की; नेत्यांच्या नाराजीमुळे उमेदवारी यादी मागे, 15 जणांची नवी लिस्ट

भाजपने(BJP) जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत सर्वात पहिलं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. त्यानंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षणणंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह यांच्याही नावांचा समावेश आहे. याशिवाय या यादीत नितीन गडकरी, मनोहरलाल खट्टर, जी.किशन रेड्डी, शिवराज सिंह चौहान, जयराम ठाकूर, डॉ. जितेंद्र सिंह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, राम माधव, तरुण चुघ, आशिष सूद, जुगल किशोर शर्मा, जेनब गुलाम अली खटना, डॉ. नरिंदर सिंह, अनुराग ठाकूर, स्मृती इराणी, जनरल व्ही.के.सिंह, रविंद्र रैना, अशोक कौल, डॉ. निर्मल. सिंह आणि कविंद्र गुप्ता आदींचाही समावेश आहे.

BJP
Chhatrapati Shivaji Maharaj Statue : 'पुतळा कोसळणं हा एक मोठा राजकीय कट ' ; भाजपचा गंभीर आरोप!

ही निवडणूक तीन टप्प्यांत होणार आहे. तिन्ही टप्प्यांमध्ये अनुक्रमे 24, 26 आणि 40 जागांवर मतदान होणार आहे. मतदानाच्या तारखा 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर अशा असून 4 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com