Prime Minister Narendra Modi and JP Nadda Sarkarnama
देश

BJP election impact : बिहारमध्ये जल्लोष सुरू असतानाच दुसरीकडे भाजपला जोरदार झटका; एका पराभवानंतर आमदाराचे नड्डांना लिहिले पत्र व्हायरल...

Rajasthan by-election news : मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या विजय संकल्प यात्रेसाठी दिलेल्या जाहिरातीतही माझे नाव नव्हते, असे सांगत आमदार सिंघवी यांनी पक्षांतर्गत वादाला तोंड फोडले होते.

Rajanand More

MLA letter to JP Nadda viral : भाजपने बिहारमध्ये मोठा विजय मिळवत पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली. राज्यात पहिल्यांदाच सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान भाजपने मिळवला आहे. एकीकडे बिहारमध्ये आनंदोत्सव साजरा होत असतानाच भाजपची सत्ता असलेल्या राजस्थानमध्ये मात्र पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे पक्षात खळबळ उडाली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीसोबतच राजस्थानातील अंता विधानसभा मतदरासंघात पोटनिवडणूक झाली. तत्पुर्वी हा मतदारसंघ भाजपकडेच होता. पण या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराकडून भाजपच्या उमेदवाराचा दारूण पराभव झाला. हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. राज्यात भाजपची सत्ता असतानाही हा मतदारसंघ परत मिळविण्यात पक्षाला अपयश आल्याने अंतर्गत वाद समोर आला आहे.

पक्षांतर्गत वादामुळेच पराभव झाल्याचा दावा आता काही नेत्यांकडून केला जात आहे. भाजपचे ज्येष्ठ आमदार प्रताप सिंह सिंघवी यांचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना लिहिलेले पत्र व्हायरल झाले आहे. सिंघवी यांनी मतदानाच्या चार दिवस आधी म्हणजेच ७ नोव्हेंबर रोजी हे पत्र लिहिले होते. सिंघवी हे सातवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत, त्यामुळे त्यांच्या नाराजीला महत्व प्राप्त झाले आहे.

सिंघवी यांनी पत्रात म्हटले आहे की, राजस्थान विधानसभेतील मी दुसरा सर्वात ज्येष्ठ आमदार आहे. मी पक्षाची अविरत सेवा केली. पण त्यानंतरही माझ्या जिल्ह्यात पोटनिवडणुकीत माजी उपेक्षा करण्यात आली. मला अपमान सहन करावा लागत आहे. प्रचारासाठी ४० नेत्यांची यादी जारी करण्यात आली. पण त्यात माझे नाव नाही. माझ्यापेक्षा ज्युनिअर आमदारांना स्थान मिळाले आहे.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना याबाबत सांगितले होते. पण त्यानंतरही माझी उपेक्षा थांबली नाही. निवडणूक समितीच्या यादीमध्ये माझे नाव सातव्या क्रमांकावर होते. पण समितीकडून माझ्याशी एकदाही संपर्क केला नाही, जबाबदारी दिली नाही. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या विजय संकल्प यात्रेसाठी दिलेल्या जाहिरातीतही माझे नाव नव्हते, असे सांगत सिंघवी यांनी पक्षांतर्गत वादाला तोंड फोडले होते. आता पराभवानंतर त्यांचे पत्र समोर आल्याने हा वाद चव्हाट्यावर आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT