Election Commission SIR : मतदारयाद्यांच्या कामासाठी प्रेशर, दोन BLO च्या आत्महत्येने खळबळ, निवडणूक आयोग अडचणीत?

Election Commission SIR workload : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी सोमवारी निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर निषेध नोंदविला.
Election Commission
Election Commission Sarkarnama
Published on
Updated on

Government employee stress : बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका आणि त्याआधीच्या मतदारयाद्यांच्या पुनर्पडताळणी म्हणजेच SIR च्या कामावरून विरोधी पक्षांकडून भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतरही आयोगाकडून केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, राजस्थान आदी राज्यांमध्ये SIR प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेवरून आता राजकारण तापले आहे.

केरळ आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एका बूथ लेव्हल अधिकाऱ्याने BLO रविवारी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. SIR शी संबंधित अतिरिक्त कामाचा ताण वाढल्याने या अधिकाऱ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप होत आहे. बीएलओंमध्येही संतापाची लाट उसळली आहे.

केरळमध्ये अनिश जॉर्ज या ४४ वर्षीय बीएलओने घरातच आत्महत्या केली. कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नसली तरी कुटुंबीय व मित्रांनी अनिशवर कामाचा प्रचंड ताण होता, असा आरोप केला आहे. त्यांना ४ डिसेंबरच्या आत दिलेले काम पूर्ण करायचे होते. त्यामुळे काहीवेळा मध्यरात्रीपर्यंत काम करायचा, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. राज्यातील बीएलओने कामावर बहिष्कार टाकत सोमवारी आंदोलन केले.

Election Commission
Devendra Fadnavis News : विविध पदांच्या परीक्षांच्या निकालानंतर चार दिवसांत नियुक्तीपत्र; CM फडणवीसांची सर्व विभागांना तंबी

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी सोमवारी निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर निषेध नोंदविला. अनिषच्या आत्महत्येवर काँग्रेस आणि सत्ताधारी सीपीआयकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगावरही निशाणा साधला जात आहे. दरम्यान, प्रशासनाने अनिश यांच्यावर कामाचा ताण नसल्याचा खुलासा केला आहे.

तमिळनाडूमध्येही एसआयआरविरोधा कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आजपासून राज्यभरात एसआयआरच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. एसआयआरसाठी कमी वेळेत अधिक काम असल्याने ताण वाढत आहे. त्यामुळे एसआयआरचा वेळ वाढवावा, अशी मागणी केली जात आहे.

Election Commission
Mahayuti Govenrment Scheme : ऐन निवडणुकीत महायुतीचं 'हुकमी अस्त्रं'! लाडकी बहीण योजनेनंतर आता नवी योजना, कोणाला होणार फायदा?

राजस्थानातील जयपूर येथे एका सरकारी शाळेतील शिक्षकाला बीएलओ म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्याने रविवारी धावत्या रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. कुटुंबीयांनी एसआयआरच्या कामाच्या ताणामुळे त्याने हे पाऊल उचलल्याचा आरोप केला आहे. मुकेश जनगीड असे या शिक्षकाचे नाव असून सुसाईड नोट आढळून आली आहे. त्यामध्ये सुपरवायझरकडून कामाबाबत दबाव टाकत निलंबनाची धमकी दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे राजस्थानमधील कर्मचारी संघटनांमध्येही संताप निर्माण झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com