Devendra Fadnavis News : विविध पदांच्या परीक्षांच्या निकालानंतर चार दिवसांत नियुक्तीपत्र; CM फडणवीसांची सर्व विभागांना तंबी

Government exam results Maharashtra : प्रशासकीय सुधारणांमध्ये मागे पडलेल्या विभागांनी गतीने कार्यवाही पूर्ण करीत विभागाचे कार्य ठळकपणे अधोरेखित करावे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra government departments : राज्य सरकारमधील विविध सेवांच्या भरतीप्रक्रियेसाठी परीक्षा घेतल्यानंतर अनेकदा निकालाला विलंब लागतो. निकाल लागला तर नियुक्तीपत्र मिळण्यासाठी अनेक दिवस वाट पाहावी लागते. त्यामुळे परीक्षार्थी तसेच निवड झालेल्यांकडून संताप व्यक्त केला जातो. याअनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना तंबी दिली आहे.

विविध पदांच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर किमान चार दिवसांमध्ये संबंधित उत्तीर्ण उमेदवाराला नियुक्तीपत्र देण्यात यावे, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे पदोन्नतीबाबतही त्यांनी सूचना केल्या असून दरवर्षी जानेवारी महिना संपेपर्यंत उपलब्ध पदोन्नतींच्या जागांनुसार 75 टक्के पदोन्नती देण्याचे त्यांनी सर्व विभागांना सांगितले आहे.

मुंबईत वर्षा निवासस्थानी सुशासनासाठी प्रशासकीय सुधारणाबाबत सोमवारी बैठक झाली. या बैठकीत प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेत फडणवीस यांनी नियुक्ती आणि पदोन्नतीबाबत महत्वाच्या सूचना दिल्या. या बैठकीत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

CM Devendra Fadnavis
Nashik ZP Election : नाशिक झेडपीची निवडणूक धोक्यात? 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली..

पदोन्नतीच्या आधारे विभागांचे रँकिंग करण्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, पदोन्नती हा प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. शासकीय सेवेत असताना पदोन्नती मिळाल्यानंतर मिळालेली जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे दरवर्षीचा आढावा घेत जानेवारी अखेरपर्यंत विभागांनी 75 टक्के पदोन्नती देण्याची कार्यवाही केली पाहिजे. या बाबीवर विभागांचे ‘रँकिंग’ करण्यात यावे.

प्रशासकीय सुधारणांमध्ये मागे पडलेल्या विभागांनी गतीने कार्यवाही पूर्ण करीत विभागाचे कार्य ठळकपणे अधोरेखित करावे. प्रत्येक विभागाने रिक्त पदांच्या संख्येनुसार आपले मागणी पत्र द्यावे, तसेच कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नियमित प्रशिक्षण घेत, त्यांची क्षमता वृद्धी करावी, असे आवाहनही फडणवीसांनी यावेळी केले.

CM Devendra Fadnavis
Bandra Fort Party Controversy : वांद्रे किल्ल्यावरील वादग्रस्त 'ओली पार्टी'; भाजप मंत्र्यांच्या उपस्थितीचा फोटो ठाकरेंच्या शिलेदारानं आणला समोर

शासनाच्या प्रत्येक विभागाने नियुक्ती नियम अद्ययावत करावे. बिंदू नामावली तपासून अचूक असल्याची खात्री करून घ्यावी. ही सर्व प्रक्रिया राबवितांना कालमर्यादेचे पालन करावे. विभागाने नियुक्ती नियम अद्ययावत करताना संबंधित पदाला सद्यस्थितीत आवश्यक असलेल्या जबाबदाऱ्यानुसार करावे. जेणेकरून भविष्यात या नियमांमध्ये तातडीने बदल करावे लागू नये, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com