Bjp Ram Mandir Ayodhya Sarkarnama
देश

BJP News : भाजपचा लोकसभा निवडणुकीचा अजेंडा जाहीर? सोशल मीडिया अकाउंटवरून दिला सूचक संदेश

Lok sabha Election 2024 Bjp Agenda Ram Mandir Ayodhya : पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी तयार असल्याचे संकेत भाजपने दिले आहेत...

Sachin Fulpagare

Lok sabha Election 2024 : भाजपच्या राजकारणात सुरुवातीपासूनच राम मंदिराचा मुद्दा अग्रभागी राहिला आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या निवडणुकांमध्ये राम मंदिर उभरणीचा विषय हा निवडणूक प्रचाराचा मुख्य मुद्दा राहिला आहे. आगामी निवडणुकांमध्येदेखील हाच मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. कारण आगामी लोकसभा आणि सध्या होऊ घातलेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या अधिकृत x ( ट्विटर ) अकाउंटच्या कव्हरचा फोटो बदलण्यात आला आहे. आता भाजपचा x (ट्विटर) अकाउंटच्या कव्हरवर राम मंदिराचा फोटो ठेवण्यात आला आहे.

अयोध्येतील बहुप्रतीक्षित राम मंदिराचे उदघाटन जानेवारी 2024 मध्ये होणार आहे. त्यामुळे लोकसभेच्या २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजप अयोध्येतील राम मंदिर हा मुद्दा घेऊन निवडणूक रिंगणात उतरेल, असे जाणकार सांगतात, तर विरोधी पक्ष जातीनिहाय जनगणना व ओबीसीचा मुद्दा महत्त्वाचा मानत असल्याचे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचर तोफा थंडावण्यापूर्वी ट्विटर अकाउंटवर राम मंदिराचा कव्हर फोटोवर फोटो ठेवत मंदिर उदघाटन तारखेचा उल्लेख केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा फोटो वापरण्यात आला आहे. या माध्यमातून भाजप पुन्हा एकदा आपला हिंदुत्वाचा अजेंडा पुढे नेत असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषद या संघटनाही राम मंदिराचा मुद्दा तळागाळापर्यंत नेण्याच्या कामाला लागल्या आहेत.

शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंदिर वही बनायेंगे, पर तारीख नही बतायेंगे असा नारा देत अनेकदा भाजपला डिवचण्याचे काम केले. त्यामुळे आता आम्ही मंदिरही बांधले आहे आणि उदघाटनाची तारीखही सांगितली आहे. असा प्रचार या माध्यमातून भजपकडून केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप आगामी निवडणुकीचा प्रचार करण्याची शक्यता अधोरेखित होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT