PM Modi News : "कुठल्या जगात वावरतो हा मूर्खांचा सरदार..."; मोदींची राहुल गांधींवर शेलक्या भाषेत टीका

PM Modi Criticises Rahul Gandhi over Made in China : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदींनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे...
PM Modi, Rahul Gandhi
PM Modi, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh Election 2023 : मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत २३० जागांसाठी १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी १५ नोव्हेंबरला म्हणजे उद्या संध्याकाळी प्रचार संपणार आहे. यामुळे भाजप आणि काँग्रेसने अखेरच्या दोन दिवसांतील प्रचारात आपली पूर्ण ताकद लावली आहे. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा हे मैदानात आहेत, तर काँग्रेसकडून राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे प्रचाराच्या मैदानात आहेत.

PM Modi, Rahul Gandhi
Rahul Gandhi : मध्य प्रदेशात काँग्रेस किती जागा जिंकणार ? राहुल गांधींनी केला मोठा दावा

पंतप्रधान मोदींची आज बैतूलमध्ये सभा झाली. या सभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींनी या वेळी नाव न घेता राहुल गांधींवर टीका केली. राहुल गांधी यांनी केलेल्या 'मेड इन चायना फोन' या टीकेचा पंतप्रधान मोदींनी समाचार घेतला. "भारतातील सर्व नागरिकांकडे मेड इन चायना फोन आहेत, असे काँग्रेसच्या एक महाज्ञानीने म्हटले. अरे मूर्खांचा सरदार, कुठल्या दुनियेत आहेस! काँग्रेस नेत्यांना आपल्या देशाची उत्तम कामगिरी न बघण्याचा मानसिक आजार आहे. जगभरात भारत आज मोबाईल फोनचा दुसरा सर्वात मोठा उत्पादन करणारा देश आहे आणि हे सत्य आहे", असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

"काँग्रेस सरकारच्या काळात देशात वर्षाला २० हजार कोटी रुपयांच्या मोबाईल फोनचे उत्पादन होत होते, तर आज ३ लाख कोटींहून अधिक रुपयांच्या मोबाईल फोनचे उत्पादन भारतात होते. संपूर्ण देश लोकलसाठी व्होकल होत आहे. सणासुदीच्या काळात स्वदेशी वस्तूंच्या खरेदीवर भारतीय नागरिकांचा भर आहे; पण काँग्रेसच्या एकाही नेत्याने स्वदेशी किंवा स्थानिक वस्तूंसाठी प्रयत्न केला का?', असा सवाल पंतप्रधान मोदींनी केला.

जिथे-जिथे काँग्रेस, तिथे-तिथे विनाश : PM मोदी

'१७ नोव्हेंबर ही तारीख जवळ येतेय तशी काँग्रेस नेत्यांची पोलखोल होत आहे. काँग्रेस निवडणुकीत पराभव स्वीकारला आहे आणि सर्व काही भाग्यावर सोडलं आहे, असं एका वृत्तात वाचलं आहे. मोदींच्या ग्वाहींसमोर आपली खोटी आश्वासनं टिकणार नाहीत, हे काँग्रेसला कळून चुकलं आहे. ही निवडणूक मध्य प्रदेशला डबल इंजिनचा वेग देण्यासाठी आहे, पण काँग्रेसला संधी देऊ नका. लूट आणि भ्रष्टाचाराने बरबटलेले हात मध्य प्रदेशच्या तिजोरीला लागू देऊ नका. काँग्रेसला फक्त लुटायचं माहिती आहे. जिथे-जिथे काँग्रेस, तिथे-तिथे विनाश", अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.

'मेड इन चायना'बद्दल काय म्हणाले होते राहुल गांधी?

"मेड इन चायना'ऐवजी आम्ही 'मेड इन मध्य प्रदेश' बनवण्याचा प्रयत्न करू. मोबाईल फोन, शर्ट आणि बूट कुठलीही वस्तू बघा तुम्हाला 'मेड इन चायना' दिसेल. पण आता आपल्याला 'मेड इन मध्य प्रदेश' करायचं आहे", असं राहुल गांधी म्हणाले होते. हरदामध्ये राहुल गांधींची सोमवारी प्रचार सभा झाली. या सभेत राहुल गांधींनी केंद्र सरकार टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com