BJP News : राहुल गांधी अडचणीत येणार? PM मोदींना पनौती म्हटल्याने भाजपची निवडणूक आयोगात धाव

Rahul Gandhi Remarks on PM Modi : राहुल गांधींनी पीएम मोदींवर केलेल्या टीकेवरून आता भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे....
Rahul Gandhi, PM Modi
Rahul Gandhi, PM Modi Sarkarnama
Published on
Updated on

Bjp vs Congress : क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. या पराभवावरून राहुल गांधी यांनी एका प्रचार सभेत पंतप्रधान मोदींना पनौती म्हणत बोचरी टीका केली. आता ही टीका भाजपच्या जिव्हारी लागली आहे. भाजपने या प्रकरणी आज निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. याशिवाय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंविरोधातही निवडणूक आयोगात धाव घेतली आहे.

Rahul Gandhi, PM Modi
Rahul Gandhi On Modi : " मोदी म्हणजे पनौती, भारतीय टीम चांगलं खेळत होती पण..."; राहुल गांधींनी डिवचलं

पंतप्रधान मोदींवरील टीकेप्रकरणी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय, भाजप नेते ओम पाठक, आणि राधा मोहन दास अग्रवाल यांनी आज निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधी आणि खर्गे यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. "पीएम म्हणजे पनौती मोदी" अशी टीका राजस्थानमध्ये एका निवडणूक प्रचार सभेत मंगळवारी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केली होती.

पंतप्रधान मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांच्या जातीचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात आला होता. पंतप्रधान मोदी म्हणजे खोटारड्यांचे सरकार आहेत, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी केली होती. यावरून खर्गे यांच्याविरोधातही भाजपने निवडणूक आयोगात टीका केली आहे.

भाजपने केली ही मागणी?

राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे. तर देशाच्या पंतप्रधानांवर अशा प्रकारची टीका म्हणजे लाजीरवाणी, निंदाजनक आणि अपमान करणारी बाब आहे, असे माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले.

राहुल गांधी यांनी आपला खरा रंग दाखवला आहे. पण राहुल गांधी यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांनी अशाच प्रकारे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या मोदींवर 'मौत का सौदागर' अशी टीका केली होती. त्यानंतर गुजरातमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला होता, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.

Rahul Gandhi, PM Modi
MP Election : मध्य प्रदेशात बंपर व्हाेटिंग, अनेक रेकॉर्ड ब्रेक; भाजप सरकारसाठी कोणते संकेत?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com