List of Rajya Sabha Candidates of BJP Sarkarnama
देश

BJP Rajya Sabha List: भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर; महाराष्ट्राबाबतचा सस्पेन्स वाढला, पाचवा उमेदवार ठरला?

Rajya Sabha Election 2026: देशभरातील राज्यसभेच्या 37 जागांसाठी येत्या 16 मार्चला निवडणूक होत आहे. त्यात महाराष्ट्रातील 7 जागांचाही समावेश आहे. भाजपकडून राज्यसभेसाठी पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे.

Deepak Kulkarni

Maharashtra News: देशभरातील राज्यसभेच्या 37 जागांसाठी येत्या 16 मार्चला निवडणूक होत आहे. त्यात महाराष्ट्रातील 7 जागांचाही समावेश आहे. भाजपकडून राज्यसभेसाठी पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातील एकाही नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. यापूर्वी महायुती 6 जागा लढवणार असल्याचं बोललं जात होतं.

त्यात भाजप 4 एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 1 तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 1 असा फॉर्म्युला निश्चित झाला होता. पण आता भाजप राज्यसभेची पाचवी जागाही लढवण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपनं राज्यसभेसाठीची पहिली उमेदवारांची यादी जाहीर करतानाच महाराष्ट्राबाबतचा सस्पेन्स कायम ठेवल्याचं दिसून येत आहे. तसेच भाजपकडून राज्यसभेसाठीच्या फायनल झालेल्या पाचही उमेदवारांची नावं कोणत्याही क्षणी जाहीर करण्याची शक्यता आहे.

देशभरातील एकूण 06 राज्यांसाठी राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया घोषणा करण्यात आली आहे. याच प्रक्रियेचा भाग म्हणून भाजपकडून बिहार, आसाम, छत्तीसगड, हरयाणा,ओडिस, या राज्यातील उमेदवारांची पहुलूएकूण उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ही 5 मार्चपर्यंत आहे. भाजपनं त्यापूर्वी 9 राज्यांमधील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. तर, महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली नाही. विशेष बाब म्हणजे भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार आहेत. त्यांचं नाव बिहार मधून जाहीर करण्यात आलं आहे.

भाजपनं त्यापूर्वी 9 राज्यांमधील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. तर, महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली नाही. विशेष बाब म्हणजे भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे राज्यसभेवर जाणार असून त्यांचं नाव बिहार आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकरवी महाराष्ट्र भाजपला महत्त्वाचा निरोप दिला आहे. राज्यसभेच्या उमेदवारीवरुन विरोधकांमध्ये वा महाविकास आघाडीत एकमत होत नसल्यानं किंवा दावे प्रतिदावे केले जात असल्यामुळे अमित शहांनी आता सहा जागांवरील विजय निश्चित मानला जात असतानाच महायुतीकडून ऐनवेळी सातव्या जागेसाठीही उमेदवार मैदानात उतरवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्याचं पाहायला मिळाल

महायुतीतील 6 पैकी भाजपच्या कोट्यातील चार जागांसाठी जवळपास 25 नेत्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत इच्छुकांची यादी निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एकंदरीत संख्याबळावरुन महाविकास आघाडीच्या वाट्याला एकमेव जागा येण्याची शक्यता आहे. पण या राज्यसभेच्या एकाच जागेवरुन विरोधकांमध्ये खटके उडाल्याचं दिसून येत आहे..

दिल्लीच्या दौऱ्याव गेलेल्या महाराष्ट्रातील भाजपच्या उमेदवारीबाबतचा आढावा घेतला होता. उमेदवारी कोणाला देण्यात यावी यासंदर्भातील नावं सुचवण्यात आली होती. यात भाजपकडून राज्यसभेसाठी रावसाहेब दानवे, विनोद तावडे, डॉ. भागवत कराड, विजया रहाटकर, मिलिंद कांबळे, कुणाल पाटील, भारती पवार, प्रीतम मुंडे, यांच्या नावांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

मंत्री रामदास आठवले, धैर्यशील पाटील, भागवत कराड हे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपच्या विनोद तावडे, रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, विजया रहाटकर, मिलिंद कांबळे, कुणाल पाटील, भारती पवार, दिलीप कांबळे, माधव भंडारी, अमर साबळे, प्रीतम मुंडे, डॉ. संगीता फुसाटे यांच्या नावांचा समावेश असल्याचे समजते.

विरोधी गटात राज्यातील सातव्या जागेच्या उमेदवारीवरुन सुरू असलेल्या गोंधळाचा भाजपचं केंद्रीय नेतृत्व फायदा उचलण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडूनच याबाबतच्या आदेश आल्यानं राज्यातील भाजप चांगलीच कामाला लागल्याचं समोर येत आहे. भाजप किंवा महायुतीला आपला सातवा उमेदवार निवडून आणायचा असेल, तर 20 अतिरिक्त मतांची आवश्यकता आहे. याच मतांच्या जुळवाजुळवीच्या समीकरणांसह सातवी उमेदवारी नेमकी कुणाच्या पदरात पडणार याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

भारतीय जनता पक्षाने जानेवारी 2026 मध्ये बिहारचे नेते आणि पाचवेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांची नवीन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. 45 वर्षीय नबीन हे भाजपच्या इतिहासातील सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष असून, त्यांच्याकडे दोन दशकांचा संघटनात्मक अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. आता त्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT