

Rajya Sabha elections 2026 : देशातील दहा राज्यांतील राज्यसभेच्या ३७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी आज भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना बिहारमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नबीन हे बिहारमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीही होते.
भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनाही सुरूवातीला राज्यसभेवर पाठविण्यात आले होते. भाजपने पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांना राज्यसभेवर पाठविण्याची परंपरा कायम ठेवली आहे. जानेवारी महिन्यातच नबीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. तेव्हापासून त्यांना राज्यसभेत पाठविले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
दरम्यान, भाजपने नबीन यांच्यासह बिहारमधून शिवेश कुमार यांनाही उमेदवारी झाली केली आहे. त्याचप्रमाणे आसासमधून तेराश गोवाला आणि जोगेन मोहन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आ आहे. तर छत्तीसगढमधून लक्ष्मी वर्मा आणि हरियाणातून संजय भाटिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पहिल्यांदाच सत्ता मिळालेल्या ओडिशातूनही भाजपने दोन नावांची घोषणा केली आहे. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल आणि सुजीत कुमार यांचा समावेश आहे. तर विधानसभा निवडणूक तोंडावर आलेल्या पश्चिम बंगालमधून भाजपने राहुल सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. या यादीत महाराष्ट्रातील एकाही नावाचा समावेश आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ दोनच दिवस बाकी आहे. अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत ५ मार्च आहे. तर १६ मार्चला मतदान आहे. महाराष्ट्रात एकूण सात जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यापैकी भाजपच्या वाट्याला चार जागा येणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस एक, शिवसेना एक आणि महाविकास आघाडीला एक जागा मिळेल. पण पार्थ पवार वगळता अद्याप एकाही उमेदवाराचे नाव अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.