BJP Sarkarnama
देश

BJP Political News : आता खासदार होणार आमदार? राजस्थानसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

Rajasthan Election 2023 : मध्य प्रदेशच्या चार याद्यांतून १३६ उमेदवारांची घोषणा

Sunil Balasaheb Dhumal

ंDelhi Political News : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा राज्यातील विधानसभेचे बिगुल वाजले आहे. येथील निवडणुकांची घोषणा होताच भाजपने सोमवारी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील आपल्या १६२ उमेदवारांची घोषणा केली. भाजपच्या राजस्थानसाठी ४१ पैकी सात विद्यमान खासदारांना, तर छत्तीसगडमध्ये दोन खासदारांना उमेदवारी दिली आहे.

राजस्थानसाठी भाजपचे खासदार राजवर्धनसिंह राठोड झोटवाडामधून, दिया कुमारी विद्याधर नगरमधून, बाबा बालकनाथ तिजारामधून, हंसराज मीना सपोत्रामधून आणि किरोरी लाल मीना सवाई माधोपूरमधून, नरेंद्र कुमार मांडवामधून आणि देवी पटेल सांचोरमधून निवडणूक लढवणार आहेत. (Latest Political News)

मध्य प्रदेशसाठी १३६ उमेदवारांची घोषणा

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत ५७ उमेदवारांची घोषणा केली आहे. यात २४ मंत्र्यांसह सर्व विद्यमान आमदारांना तिकीट देण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान बुधनीमधून निवडणूक लढवणार आहेत. याआधी भाजपने मध्य प्रदेशसाठी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीत एकूण ७९ (३९+३९+१) नावे जाहीर केली होती. मध्य प्रदेशसाठी २३० पैकी भाजपने आतापर्यंत १३६ उमेदवारांची घोषणा केली आहे.

छत्तीसगडमध्ये ६४ उमेदवारांची घोषणा

भाजपने छत्तीसगडसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत ६४ उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केलेली असून, त्यात दोन खासदारांची नावे आहेत. खासदार आणि केंद्रीय मंत्री रेणुका सिंह भरतपूर-सोनहाट मतदारसंघातून, गोमती साई पाथळगावमधून आणि बिलासपूरचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष अरुण साओ लोर्मी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांत मतदान

छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबर असे दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यानंतर २३ नोव्हेंबरला राजस्थान आणि ३० नोव्हेंबरला तेलंगणामध्ये मतदान होणार आहे. ३ डिसेंबर रोजी सर्व पाचही राज्यांचे निकाल एकाच वेळी येणार आहेत.

दरम्यान, निवडणूक आयोगाने सोमवारी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या राज्यांतील निवडणूक प्रक्रिया २७ दिवस चालणार आहे. मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला पहिले मतदान होणार आहे. यानंतर १७ नोव्हेंबरला मध्य प्रदेशात मतदान होणार आहे. (Maharashtra Political News)

कुठे कुणाची सत्ता...

सध्या मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. तेलंगणा राज्यात के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष सत्तेवर आहे. मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटचे सरकार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT