MP DNV Senthilkumar S Sarkarnama
देश

BJP : भाजप जिंकत असलेली राज्ये म्हणजे 'गोमूत्र'..! खासदाराच्या वक्तव्याने मोठा गदारोळ

Rajanand More

Parliament Winter Session : तमिळनाडूत सत्ताधारी पक्ष असलेल्या द्रमुकच्या नेत्यांकडून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य केली जात आहे. त्यात आता खासदार डीएनव्ही सेंथिल कुमार एस यांच्या विधानाची भर पडली आहे. भाजप केवळ हिंदी भाषिक पट्ट्यामधील राज्य जिंकत आहे. या राज्यांना आपण सामान्यत: गोमूत्र राज्य म्हणतो, असे सेंथिल कुमार म्हणाले आहेत. त्यावरून लोकसभेत मोठा गदारोळ झाला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी लोकसभेत जम्मू आणि काश्मीर आरक्षण दुरुस्ती विधेयक सादर केले. या विधेयकावर चर्चेदरम्यान खासदार सेंथिलकुमार (MP DNV Senthilkumar S) यांनी हे विधान केले आहे. भाजपने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मोठा विजय मिळवला आहे. त्याचा संदर्भ देत सेंथिल यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. (Gaumutra states)

सेंथिल कुमार म्हणाले की, भाजप केवळ हिंदी पट्टयातील राज्य जिंकत आहे. आम्ही भाजपला दक्षिणेत येऊ देणार नाही. काश्मीरप्रमाणेच दक्षिण भारतातील राज्यांना केंद्रशासित प्रदेशात रुपांतरीत करण्याचा धोका आहे. तिथे ते जिंकू शकत नसल्याने केंद्रशासित प्रदेश करून राज्यपालांमार्फत राज्य करू शकतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप नेत्यांनी सेंथिल कुमार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेखी म्हणाल्या, सनातनी संस्कृतीचा हा अपमान आहे. डीएमकेला लवकरच गोमूत्राचे फायदे समजतील. देशातील लोक हे सहन करणार नाहीत, याची जाणीव त्यांना आहे. देशाच्या भावनांशी खेळण्याचा जे प्रय़त्न करतील, त्यांना जनताच धडा शिकवेल.

देशभरातील जनतेने भाजपला स्वीकारले आहे. असे म्हणणाऱ्यांना याची माहिती नाही. त्यांना भारताची संस्कृती माहिती नाही. देशातील नागरिकांना भाजपवर विश्वास असून पंतप्रधान मोदी हे केवळ भारतीय नेते नसून आता ते जगातील प्रभावशाली नेते बनले आहेत, असे भाजपचे खासदार जगन्नाथ सरकार म्हणाले.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT