Congress Government : तेलंगणातील मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडविण्यात काँग्रेस पक्षश्रेष्ठींना यश मिळाले आहे. राज्याचे प्रभारी व विशेष निरीक्षकांनी दिलेल्या अहवालानंतर पक्षाने रेवंथ रेड्डी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. त्यांच्यासह काही आमदारांचा शपथविधी येत्या सात तारखेला होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसकडून अद्याप रेड्डी यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. राज्यातील बहुतेक आमदारांनी रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) यांच्याच नावाला पसंती दर्शविल्याचे समजते. तेलंगणामध्ये पहिल्यांदाच काँग्रेसला यश मिळवून देण्यात त्यांचाच मोठा वाटा असल्याचे आमदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे रेवंथ हेच तेलंगणाचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, असे समजते.
‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. ‘रेवंथ रेड्डी हेच मुख्यमंत्री होतील. येत्या सात तारखेला त्यांचा शपथविधी होईल. त्यांच्यासोबत आणखी काही मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. हैदराबादमध्ये सोमवारी झालेल्या नवनियुक्त आमदारांच्या बैठकीतच रेवंथ रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील,’ असे ‘एएनआय’ने म्हटले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, तेलंगणामध्ये काँग्रेसला ६५ जागा मिळाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. त्यांनी राज्यभर झंझावती दौरा करून केसीआर सरकारविरोधात वातावरण तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचे मानले जाते. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे प्रकरण प्रलंबित असल्याने काही आमदारांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाला विरोध केल्याचेही समजते. पण अनेक आमदारांनी रेवंथ रेड्डी यांच्याच नावाला पसंती दिल्याचे समजते.
(Edited By - Rajanand More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.