Election Result : तेरी जीत से ज्यादा चर्चे मेरी हार के हैं! बालेकिल्ल्यातील पराभव गृहमंत्र्यांच्या जिव्हारी

Election Result : नरोत्तम मिश्रा यांचा पराभव प्रदेश भाजपसाठी नामुष्की मानली जात आहे.
Narottam Mishra
Narottam MishraSarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh Assembly Election : मध्य प्रदेशात भाजपला दणदणीत विजय मिळाला असला तरी काही बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामध्ये गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांचे नाव आहे. बालेकिल्ल्यातच झालेला पराभव मिश्रा यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. गृहमंत्री असूनही पराभव झाल्याने राज्यभरात जोरदार चर्चा रंगली आहे. पराभवानंतर पहिल्यांदाच मिश्रा यांचा शायराना अंदाज पाहायला मिळाला. त्यावरूनही आता तर्कवितर्क लढविले जात आहेत.

मिश्रा हे मध्य प्रदेश भाजपमधील मोठे नेते आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांच्या मंत्रिमंडळात ते गृहमंत्री आहेत. त्यामुळे त्यांचा पराभव प्रदेश भाजपसाठी नामुष्की मानली जात आहे. दतिया विधानसभा मतदारसंघ हा त्यांचा गड असूनही ७ हजार ७४२ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र भारती यांनी त्यांचा पराभव केला.

Narottam Mishra
Telangana CM : मुख्यमंत्री कोण? काँग्रेसचं ठरलं; सात तारखेला होणार शपथविधी

मंगळवारी दतिया येथून भोपाळला जाताना रेल्वे स्थानकात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. त्यांच्या संवाद साधताना मिश्रा यांचा शायराना अंदाज पाहायला मिळाला. ‘अपनी जीत पर इतना गुमान मत कर, तेरी जीत से ज्यादा चर्चे तो मेरी हार के हैं’, अशी शायरी करत मिश्रा यांना कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. मात्र, मिश्रा यांनी यातून नेमका कोणावर निशाणा साधला, याची चर्चा आता रंगली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दतिया येथे सोमवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधतानाही त्यांनी पराभवामुळे किंचितही घाबरलो नसल्याचे विधान मिश्रा यांनी केले होते. ‘क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत मैं, समंदर की लहर पीछे हट जाए तो किनारे पर घर मत बना लेना, मैं लौटकर वापस जरूर आऊंगा’, सूचक इशाराही मिश्रा यांनी दिला. मिश्रा यांचा पराभूत केलेले राजेंद्र भारती यांना उद्देशून हा इशारा असल्याची चर्चा रंगली आहे.

(Edited By - Rajanand More)

Narottam Mishra
India Alliance : 'इंडिया' आघाडीची उद्याची बैठक लांबणीवर, काय आहे कारण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com