BJP Sarkarnama
देश

BJP Politics : विजयाच्या हॅटट्रिकसाठी कंबर कसलेल्या भाजपला जोरदार धक्का; महापालिकेत बंडखोर उमेदवाराकडून पराभव

Jhansi Municipal Corporation election, BJP rebel candidate, Neeta Yadav : झांसी महापालिकेत बंडखोर नगरसेविका नीता यादव यांचा विजय; भाजपच्या अधिकृत उमेदवाराला पराभव, क्रॉस वोटिंगमुळे पक्षाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह

Rajanand More

Uttar Pradesh politics : उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत विजयाच्या हॅटट्रिकसाठी भाजपने कंबर कसली आहे. पुन्हा एकदा सत्ता काबीज करून विरोधकांना धूळ चारण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपची रणनीती महापालिकेतील निवडणुकीत मात्र फेल ठरल्याने संपूर्ण राज्यात चर्चेचा मुद्दा बनली आहे. झांसी महापालिकेच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.

महापालिकेच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीत नगरसेविका असलेल्या बंडखोर उमेदवाराने पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला झटका दिला आहे. या निवडणुकीत पक्षाच्या काही नगरसेवकांसह विरोधकांनीही भाजपच्या बंडखोर उमेदवाराला साथ देत भाजपला धूळ चारली. बंडखोर उमेदवार नगरसेविका नीता यादव यांचा कार्यकारिणीच्या निवडणुकीत विजय झाला आहे.

भाजपच्या अधिकृत उमेदवार नगरसेविका रितिका तिवारी यांना पराभव सहन करावा लागला. यादव यांना नऊ तर तिवारी यांना केवळ सहा मते मिळाली. निवडणुकीत क्रॉस वोटिंगचा फटकाही भाजपला बसला आहे. यादव यांच्या बंडखोरीमुळे निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

तिवारी यांना उमेदवारी दिल्याने यादव नाराज होत्या. त्यांनी भाजपचे अन्य नाराज नगरसेवक आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना एकत्रित करत मोट बांधली आणि विजय मिळविला. त्यामुळे या विजयाची जोरदार चर्चा होत आहे. या निवडणुकीत बसपाचे महेश गौतम यांच्यासह भाजपचे रामजी यादव, सुनील नैनवाणी, राखी परिहार आणि राजकुमारी वर्मा हेही विजयी झाले. मात्र, रितिका तिवारी यांच्या पराभवाचीच चर्चा रंगली होती.

दरम्यान, राज्यात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक आहे. मध्य प्रदेशात मोहन यादव हे मुख्यमंत्री असून दोन्ही राज्यांच्या सीमेवर असलेल्या भागात यादवांचे वर्चस्व आहे. त्यामुळे यादव यांचा विजय महत्वपूर्ण मानला जात आहे. अर्थात या निवडणुकीत नगरसेवकच मतदार होते. त्यामुळे प्रत्यक्ष विधानसभेच्या निवडणुकीवर त्याचा परिणाम होणार नाही. मात्र, रणनीतीमध्ये चाणक्य असलेल्या भाजपला महापालिकेतील अंतर्गत निवडणुकीत राजकीय समीकरण साधता आले नाही, याचीच सर्वाधिक चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT