

Thyagaraj Stadium controversy : वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आपल्या अधिकारांचा कसा दुरूपयोग केला जातो, याचे उदाहरण काही महिन्यांपूर्वी समोर आले होते. आपल्या लाडक्या श्वानाला फिरवण्यासाठी एका IAS जोडप्याने थेट स्टेडिअम रिकामे करायला लावले होते. मात्र, ही दादागिरी त्यांना चांगली महागात पडली. सरकारने महिला आयएएसला सक्तीची निवृत्ती दिली. आता सुप्रीम कोर्टानेही त्यांना झटका दिला आहे.
आयएएस अधिकारी रिंकु धुग्गा आणि त्यांचे आयएएस पती संजीव खिरवार यांनी दिल्लीतील त्यागराज स्टेडिअम श्वानाला फिरवण्यासाठी रिकामे करायला लावल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. खेळाडूंनीच हा आरोप केला होता.
ही घटना मे २०२२ मधील आहे. त्यावेळी हे प्रकरण चांगलेच गाडले होते. त्यानंतर दिल्लीत कार्यरत असलेल्या पती-पत्नीवर केंद्र सरकारने सुरूवातीला बदलीची कारवाई केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने धुग्गा यांना २०२३ मध्ये सक्तीने निवृत्त केले होते.
सरकारच्या या कारवाईविरोधात धुग्गा यांनी केंद्रीय प्रशासकीय लवादाकडे दाद मागितली होती. लवादाने त्यांच्या बाजूने निकाल देत पुनर्नियुक्तीचे आदेश दिले. त्यावर दिल्ली हायकोर्टाने १५ एप्रिलला शिक्कामोर्तब केले होते. या निकालाविरोधात केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती देऊन धुग्गा यांची सक्तीची निवृत्ती कायम ठेवण्याची मागणी सरकारने सुप्रीम कोर्टात केली आहे. त्यावर सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी झाले. कोर्टाने हायकोर्टाच्या निकालाला स्थगिती दिली आहे. तसेच धुग्गा यांना नोटीस जारी करत आपली बाजू मांडण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, धुग्गा यांच्या सप्टेंबर २०२३ मध्ये सरकारने सक्तीच्या निवृत्तीची कारवाई केली होती. त्यावेळी त्या अरुणाचल प्रदेश सरकारमध्ये प्रधान सचिव पदावर कार्यरत होत्या. त्याआधी त्या दिल्लीत कार्यरत होता.
हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांची २०२२ मध्ये अरुणाचलमध्ये बदली करण्यात आली होती. तर दिल्ली सरकारमध्ये महसूल विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असलेले त्यांचे पती संजीव खिरवार यांची याच प्रकरणावरून लडाखमध्ये बदली करण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.