b y vijayendra Karnataka Election 2023 :  Sarkarnama
देश

Karnataka Election 2023 : 'मोदी मैजिक चल रहा है..' ; BJP पूर्ण बहुमताने सत्तेत येणार : येदियुरप्पा

Karnataka Election 2023 : "मोदी मैजिक चल रहा है.." असे विजयेंद्र म्हणाले.

सरकारनामा ब्यूरो

Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सकाळपासून मतदानास सुरवात झाली आहे. सकाळी दहा आत्तापर्यंत नऊ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर येत आहे. माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा म्हणाले, "भाजप पूर्ण बहुमताने सत्तेत येणार आहे. मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे,"

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांचे सुपुत्र बीवाय विजयेंद्र (b y vijayendra) यांनी वडीलांसोबत मतदानाचा हक्क बजावला, त्यानंतर ते म्हणाले, "या निवडणूक भाजप बहुमताने सत्तेत येईल. लिंगायत समाजासह अन्य जाती-समाज भाजपसोबत आहे. काँग्रेसचा या निवडणुकीत वाईट पराभव होणार आहे," "मोदी मैजिक चल रहा है.." असे विजयेंद्र म्हणाले.

शिकारीपुरा विधानसभा मतदार संघातून विजयेंद्र निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचा वडीलांचा हा पारंपारिक मतदारसंघ आहे. "ही माझी पहिली निवडणूक आहे. निवडणूक लढण्यास पक्षाने मला संधी दिली, याचा मला आनंद आहे. शिकारीपुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा मला आनंद आहे, "

कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी मतदानास सुरवात झाली आहे. मतदानासाठी सकाळपासून मतदान केंद्राबाहेर मतदारांना रांगा लावल्या आहेत. अभिनेता प्रकाश राज, रमेश अरविंद , इन्फोसिसचे अध्यक्ष नारायण मूर्ती, सुधा मूर्ती आदींनी मतदानाचा हक्क बजावला. मुदिगेरे चिक्कमगलुरु येथे लग्नापूर्वी एका तरुणीने मतदान केले. त्यानंतर ती मंडपाकडे रवाना झाली. राजकीय पक्षाच्या नेतेही मतदान करण्यासाठी मतदान करण्यासाठी येत आहेत.

या विधानसभेसाठी काँग्रेसचे २२१, भाजप सर्व २२४, जेडीएस २०८, आम आदमी पार्टी ने २०८, बसपा १२७, समाजवादी पार्टी १४,राष्ट्रवादीचे ९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.या निवडणुकीत भाजपचे ३८, काँग्रेस ३६, जेडीएसचे ३१ उमेदवार एससी आहेत. काँग्रेसचे १५, जेडीएसचे २० उमेदवार मुस्लिम आहेत. भाजपचा एकही उमेदवार या वर्गांतील नाही.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसोबत आज पंजाबच्या जालंधर लोकसभा मतदार संघ, उत्तर प्रदेशातील स्वार टांडा विधानसभा, छानबे विधानसभा , आणि ओडिशा येथील झारसुगुड़ा आणि मेघालय येथी सोहियोंग विधानसभा मतदार संघात आज मतदान होत आहे.

SCROLL FOR NEXT