Atishi, Vijender Gupta Rekha Gupta Sarkarnama
देश

Delhi Assembly : दिल्लीत आणखी एक गुप्ता मोठ्या पदावर; मोदी-शहांकडून पुन्हा सरप्राईज...

Vijender Gupta CM Rekha Gupta Assembly speaker BJP News : विजेंद्र गुप्ता हे तीनवेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. ते विरोधी पक्षनेतेही होते.

Rajanand More

New Delhi News : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी कामकाजाला दणक्यात सुरुवात केली आहे. नव्या सरकारचे विधानसभेचे पहिले अधिवेशनही सोमवारपासून सुरूवात झाली. अध्यक्षपदी विजेंद्र गुप्ता यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे दिल्लीच्या राजकारणात आता दोन गुप्तांची चलती असणार आहे.

रेखा गुप्ता यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सर्वांनाच धक्का दिला होता. या शर्यतीत विजेंद्र गुप्ता यांच्यासह अन्य काही ज्येष्ठ नेत्यांची नावे होती. पण पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांना संधी देण्यात आली. विधानसभा अध्यक्षपद कुणाला मिळणार याबाबत उत्सुकता वाढली होती.

मोदी-शहांनी विधानसभा अध्यक्षपद देतानाही धक्का दिल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्री गुप्ता आणि विधानसभा अध्यक्षही गुप्ता असे समीकरण आता तयार झाले आहे. त्यामुळे विधानसभेतील महत्वाची पदे गुप्ता हे नाव कोरले गेले आहे. विजेंद्र गुप्ता हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ते यावेळी सलग तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत.

गुप्ता यांची आज विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. आपने या पदासाठी उमेदवार दिला नाही. त्यामुळे निवडणूक झाली नाही. गुप्ता हे पहिल्यांदा 2015 मध्ये निवडून आले होते. त्यावेळी भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी गुप्ता हे एक आमदार होते. त्यावेळी ते विरोधी पक्षनेते होते.

2020 आणि 2025 च्या निवडणुकीतही विजयी होत गुप्ता यांनी हॅटट्रिक केली. त्यामुळे ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत पुढे होते. पण पद न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. आता त्यांना विधानसभा अध्यक्षपद देत मोदी-शहांकडून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. गुप्ता यांनी विद्यार्थी संघटनेतून राजकारणात एन्ट्री केली होती. दिल्ली विद्यापीठात ते उपाध्यक्ष होते. तसेच काही काळ नगरसेवकही होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT