Shivraj Singh Chauhan, JP nadda sarkarnama
देश

Political News : भाजपच्या दक्षिण मोहिमेची कमान माजी मुख्यमंत्र्याच्या हाती?

Shivraj Singh Chauhan : लोकसभा निवडणुकीत दक्षिण भारतातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न

सरकारनामा ब्यूरो

BJP News : मध्य प्रदेशमध्ये सत्ता मिळूनही शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद न देता भाजपने सर्वांना धक्का दिला. मात्र, येवढ्या मोठ्या नेत्याला आता कोणती जबाबदारी देणार यावर चर्चा रंगल्या होत्या. अखेर जेथे भाजपला सत्तेसाठी झगडावे लागत आहेत त्या दक्षिण भारतातील मोहिमेची जबाबदारी शिवराज सिंह यांच्याकडे देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. शिवराज सिंह यांनी नुकतीच भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा (jp-nadda) यांची भेट घेतली. या भेटीनंतर, पक्ष आपल्यावर जी जबाबदारी देईल ती विनम्रपणे आपण स्वीकारू, असे म्हणत त्यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे संकेत दिले.

नुकत्याच झालेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने यश मिळवले. मात्र, दक्षिण भारतामध्ये भाजपला सत्ता मिळवण्यास अपयश आले आहे. कर्नाटकामधील सत्ता गेली आता तेलंगणामध्ये काँग्रेस सत्तेत आहेत. त्यामुळे दक्षिण भारतात सत्तेत नसलेल्या भाजपसाठी लोकसभेत खासदार निवडून आणण्याचे मोठे चॅलेंज आहे. म्हणूनच पक्षाने मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह यांच्यावर मोठी जबाबदारी दिल्याची चर्चा आहे. भाजपच्या दक्षिण भारतातील मोहिमेचे नेतृत्व शिवराज सिंह करण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर दक्षिणेतील एक ते दोन राज्यांची जबाबदारी देण्यात येईल.

विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजप लोकसभेच्या तयारीमध्ये लागला आहे. उत्तर भारतात ज्या प्रमाणे भाजपला यश मिळते तसे यश दक्षिण भारतात मिळत नाही. दक्षिण भारतातील प्रादेशिक पक्ष भाजपला चांगली टक्कर देतात. शिवाय उत्तर भारतातील राज्यातून सत्ता गेलेल्या काँग्रेसकडे कर्नाटक आणि तेलंगणा ही दक्षिणेतील दोन महत्त्वाचे राज्य आहेत. त्यामुळे लोकसभेला भाजपला येथून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहेत. त्यामुळे भाजपने दक्षिण भारताच्या मोहिमेची जबाबदारी वरिष्ठ नेत्याकडे देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामध्ये शिवराज सिंह यांचे नाव चर्चेत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवराज सिंह हे मध्य प्रदेशचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांची मोठी लोकप्रियता मध्य प्रदेशात आहे. त्यांची मुख्यमंत्रिपदी पुन्हा निवड झाली नसली तरी संघटनात्मक पातळीवर त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याचे संकेत भाजपमधूनच मिळत आहेत. अनुभवी नेत्याच्या संघटनेसाठी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा आहे, असे भाजपमधून सांगितले जात आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT