MP Satyapal Singh  Sarkarnama
देश

Ayodhya Ram Mandir: 'प्रभू श्रीराम हिंदूंचेच नाही तर मुस्लिमांचेही दैवत'; भाजपच्या सत्यपाल सिंहांची प्रतिक्रिया

MP Satyapal Singh : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणावरून राजकीय टीका टिप्पण्या सुरु आहेत.

Anand Surwase

Delhi News: अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणावरून सध्या राजकीय आणि सामाजिक टीका टिप्पण्या सुरु असल्याचे दिसून येत आहेत. यावर माजी पोलिस अधिकारी आणि भाजप खासदार डॉ.सत्यपाल सिंह यांनी प्रभू श्रीराम हे केवळ हिंदूचेच नाही तर मुस्लिमांचे देखील आराध्य दैवत होते, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

तसेच श्रीरामाच्या दरबारात सर्वांचे स्वागत असून प्रत्येकाला दर्शन घेण्याचे स्वांतत्र्य असल्याचेही मत सत्यपाल सिंह यांनी व्यक्त केले. ते शनिवारी बागपतमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. येत्या 22 जानेवारी 2024 रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

खासदार सत्यपाल म्हणाले, 'प्रभू राम हे सर्वांचे दैवत आहेत. हजारो वर्षापूर्वी श्रीरामांचा जन्म झाला, त्यांना मर्यादा पुरषोत्तम म्हणून ओळखले जात असून त्यांनी जो मार्ग दाखवला आहे, त्याच मार्गावर आपल्या सर्वांना चालायचे आहे. तसेच श्रीराम केवळ हिंदूंचेच नाही तर मुस्लिमांचेही होते. त्यामुळे त्यांचे दर्शन घेण्याचा सर्वांना अधिकार आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी करून प्रत्येकाला प्रभू रामाचे दर्शन करता येणार असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अयोध्येतील सोहळ्याच्या निमंत्रणावरून सुरू असलेल्या वादावर बोलताना सत्यपाल सिंह म्हणाले, श्रीराम मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अनेकांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र मुख्य कार्यक्रमासाठी जे निमंत्रण दिले जात आहे, ते मंदिर समितीकडून दिले जात आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राजकारण करण्याची गरज नसल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या बागपत लोकसभा मतदारसंघातील मतदारांनाही विकासाची गॅरंटी दिली आहे.

गॅरटीवर बोलताना सत्यपाल म्हणाले, ज्याप्रमाणे पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेला विकासाची गॅरंटी दिली आहे. त्याप्रमाणे मी देखील बागपत मतदारसंघातील मतदारांना विकासाची गॅरंटी देत आहे. मतदारसंघातील प्रत्येक गाव खेड्यापर्यंत सरकारी योजना पोहचवल्या जातील. कोणताही गरीब मतदार सरकारी योजनेपासून वंचित राहणार नाही. यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या आहेत.

कोण आहेत सत्यपाल सिंह ?

सत्यपाल सिंह भाजपचे लोकसभा खासदार असून मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांच्या उच्च शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. राजकारणात येण्यापूर्वी सत्यपाल सिंह हे महाराष्ट्र केडरचे पोलिस अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. त्यांनी मुंबई, पुणे, नागपूरचे पोलिस आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे.

तसेच मुंबईतील अंडरवर्ल्डची साखळी उद्धवस्त करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. दरम्यान, 2014 मध्ये राजकारणात जाण्यासाठी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली होती.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT