Shivsena News : ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा 1 जानेवारी रोजी वाढदिवस आहे. दरवर्षी प्रमाणे वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला म्हणजे सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवश खैरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन सदिच्छा भेट घेतली. (Chandrakant Khaire News) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या उमेदवारीचे गिफ्ट खैरेंना देणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मातोश्रीवर रवाना होण्यापुर्वी खैरे (Chandrakant Khaire) यांनी देवदर्शन घेत सरत्या वर्षाला निरोप दिला. खैरे हे धार्मिक वृत्तीचे आहेत. होम-हवन, पुजा-अर्चा, अन्नदान, भागवत सप्ताह आणि इतर धार्मिक कार्यक्रमात ते हिरारीने सहभाग घेतात. (Shivsena) वैयक्तिक, राजकीय प्रवासात जे काही मिळालं ते देवाच्या आशिर्वादाने अशी भावना ठेवून खैरे कितीही व्यस्त असले तरी आपली नित्य पूजा आणि देवदर्शन कधीच चुकवत नाहीत.
चतुर्थीला राजुरेश्वराचे न चुकता दर्शन, शनिवारी भद्रामारोती, घृष्णेश्वर आणि शहरातील सुपारी हनुमानापुढे नतमस्तक होऊनच खैरे आपल्या दैनंदिन कामाची सुरूवात करतात. (Marathwada) 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काही दिवसांतच खैरेंनी पुन्हा पुर्वीप्रमाणेच कामाला सुरूवात केली. 25-30 वर्षांपासून असलेला जनसंपर्क कमी होऊ नये किंवा तो तुटू नये याची पुरेपूर काळजी घेत खैरे कायम जिल्ह्यात फिरत राहिले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
संघटनात्मक कामासाठीही त्यांनी तितकाच वेळ दिला. खैरे यांच्या राजकीय आयुष्यातील कटू आठवणींमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि शिवसेनेमध्ये पडलेली फूट या दोन घटनांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या परीस स्पर्शाने खैरे यांच्यासारख्या असंख्य शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांच्या आयुष्याचं सोनं झालं, त्या बाळासाहेबांची शिवसेना फुटल्यानंतर खैरे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले.
या निष्ठेचे फळ येणाऱ्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या रुपाने त्यांना मिळण्याची शक्यता आहे. खैरे यांनी त्यादृष्टीने तयारीही सुरू केली आहे. उद्या, 1 जानेवारी रोजी खैरे यांचा वाढदिवस आहे. तत्पुर्वी खैरे यांनी देवदर्शन घेत सरत्या वर्षाला निरोप दिला. वर्षातील शेवटच्या संकष्टी चतुर्थीनिमित्त काल श्रीक्षेत्र राजूर गणपती येथे दर्शन घेऊन त्यांनी अभिषेक केला.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.