Panaji News : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर २६ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. या हत्याकांडानंतर देशातील घडामोडी वाढल्या आहेत. त्यामुळे गेल्या आठ दिवसापासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय सुरक्षा प्रश्नांवर व्यस्त झाले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडी लांबणीवर पडल्या आहेत. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासह गोव्यातील मंत्रिमंडळ फेरबदल या कारणामुळे गेल्या काही दिवसापासून लांबणीवर पडला आहे.
गोव्यातील काही मंत्र्यांना डच्चू देऊन मंत्रिमंडळाची फेररचना करण्याबाबत यापूर्वीच पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवला असला, तरी अद्याप राज्यातील मंत्र्यांची यादी तयारी झालेली नाही. गोव्यातील एक वादग्रस्त मंत्री आपल्याच काही वादग्रस्त विधानांमुळे आणखी अडचणीत आला आहे. तो आपल्या वर्तणुकीमुळे भाजपलाही (BJP) अडचणीत आणतो आहे. त्याला मंत्रिमंडळातून काढून टाकण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांने दिली आहे.
त्याशिवाय आणखी दोन मंत्रीही हिटलिस्टवर आहेत. त्यातील एक मंत्री वयाने ज्येष्ठ आहेत. त्यामुळे त्यांना जादा कामामुळे ताण येत आहे. त्याशिवाय आणखी एक मंत्री गेल्या काही दिवसापासून आजारी आहेत. त्यामुळे गेल्या बऱ्याच दिवसापासून त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागत आहेत. त्यामुळे त्यांच्या विभागाच्या कामावर परिणाम झाला आहे.
सध्या शिरगाव जत्रेच्या तयारीत संपूर्ण उत्तर गोवा गुंतला आहे. त्यामुळे राजकारणाकडे कोणाचे फारसे लक्ष नाही. त्याचप्रमाणे विरोधी पक्षांचाही फारसा दबाव सरकारवर नाही. त्यामुळे पक्षश्रेष्ठीचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. गोव्याची दखल तातडीने घ्यावी, असे कोणाला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.
‘त्या’ मंत्र्याला काढण्याबाबत पक्षश्रेष्ठी ठाम
‘गोव्यातील मंत्रिमंडळातील बदल गेल्या अनेक दिवसापासून झालेला नाही. त्यामध्ये बदल झाला पाहिजे हे पक्षसंघटनेचेही मत आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे त्यासंदर्भात बोललो परंतु, पक्षश्रेष्ठी अत्यंत व्यस्त असल्याने हे बदल सतत पुढे ढकलले जात आहेत, अशी माहिती एका ज्येष्ठ नेत्याने ‘गोमन्तक’ला दिली. ‘त्या वादग्रस्त मंत्र्याला काढून टाकण्याबाबत पक्षश्रेष्ठी ठाम आहेत. त्याच्या कार्यपद्धतीचीही पक्षश्रेष्ठींना कल्पना देण्यात आलेली आहे. गोव्यातून प्रतिदिनी सरकारचा अहवाल दिल्लीला जातो’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. हा मंत्री अत्यंत बेदरकारपणे वागतो आणि बोलतो, परंतु उद्या मंत्रिपद गेल्यानंतर त्याच्या मतदारसंघातही त्याचे काही मूल्य राहणार नाही, असे भाजपच्या एक जबाबदार नेत्याने सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.