Local body elections news : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचे मोठे विधान; तारीख सांगत केली 'ही' घोषणा

NCP leader statement News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोर्टात असलेल्या याचिकेवरील सुनावणी बाकी असल्याने निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता कमी आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका झाल्याने येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. पावसाळ्यापूर्वी राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुका होतील असा कयास होता. मात्र, कोर्टात असलेल्या याचिकेवरील सुनावणी बाकी असल्याने निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता कमी आहे.

राज्यातील सर्वच राजकीय पक्षाकडून निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यातच निवडणुका लांबणीवर पडल्या असल्याने कार्यकर्त्याचा हिरमोड झाला असतानाच आता या रखडलेल्या निवडणुका येत्या काळात कधी होणार? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल मोठं विधान केलं आहे. त्यामुळे सर्वाना त्याची उत्सुकता लागली आहे. त्यासोबतच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिलांसाठी किती टक्के जागा सोडणार? याबाबत मोठे विधान केले आहे.

राजकीय पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी नेतेमंडळी व कार्यकर्ते आतापासूनच कामाला लागले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) "सशक्त संघटन" कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांनी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्य केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar Politics: कर्जमाफीच्या प्रश्नावर राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षात का आहे गोंधळ?

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला जनतेत विश्वास निर्माण करायचा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 50 टक्के महिलांना संधी देण्याचा निर्धार तटकरेंनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या काळात होत असेलल्या निवडणुकीत महिलांना मोठ्या प्रमाणात संधी मिळणार आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar Big Statement: मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजितदादांचे मोठे विधान; थेट तारीखच सांगितली, कोणाला मिळणार संधी?

यावेळी सुनील तटकरेंनी (Sunil Tatkare) लाडकी बहीण योजनेवर करण्यात आलेल्या टीकेला उत्तर दिले. "लाडकी बहीण" आणि "लेक योजना" या योजनांनर टीका करण्यात आली, पण अजित पवार यांनी त्या योजनांना यशस्वी केले, असे सुनील तटकरेंनी योजनांना मिळालेल्या यशाबद्दल भाष्य केले.

Ajit Pawar
Pahalgam Terror Attack: नाशिकमध्ये विवाह केला तरीही "त्या" महिला पाकिस्तानीच, देश सोडण्याची टांगती तलवार?

आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे

जनतेच्या मनात विविध प्रश्न निर्माण होतात, तेव्हा आपण पक्ष म्हणून लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे आणि ते सोडवले पाहिजे. आगामी निवडणुकीत आपण महायुती म्हणूनच सामोरे जाणार आहोत. प्रशासनावर आज अजित दादांची पकड आहे, म्हणून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. आगामी निवडणुकांसाठी पुढे येऊन काम करावे, असे म्हणत सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावले.

Ajit Pawar
Pahalgam Terror Attack: नाशिकमध्ये विवाह केला तरीही "त्या" महिला पाकिस्तानीच, देश सोडण्याची टांगती तलवार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com