BJP faces major embarrassment in Loha municipal elections as voters reject nepotism Sarkarnama
देश

BJP President update : अखेर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे नाव ठरले; ‘या’ निवडीमुळे इतिहास घडणार

Nitin Nabin BJP President : उमेदवारी अर्जावर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मावळते राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांच्या सह्या असतील.

Rajanand More

BJP organizational politics : मागील अनेक महिन्यांपासून प्रतिक्षा असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावावर अखेर शिक्कोमोर्तब झाले आहे. अध्यक्षांच्या निवडणुकीची तारीखही ठरली आहे. पुढील आठवड्यात भाजपला नवीन अध्यक्ष मिळतील. अध्यक्षपदाची निवड होताच इतिहास घडणार आहे. त्यामुळे ही भाजपसाठी ही निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे.

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन हे पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष असणार आहेत. पक्षसंघटनेने त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते. ते सोमवारी (ता. १९) अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नबीन यांची बिनविरोध निवड होणार हे जवळपास निश्चित मानले जात असून त्यांच्या नावाची घोषणा २० जानेवारीला होईल.

भाजप सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नितीन नबीन यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे. भाजपच्या ४६ वर्षांच्या इतिहासातील ते सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष ठरतील. नवीन यांच्या उमेदवारी अर्जावर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मावळते राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांच्यासह पक्षाचे अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रस्तावक आणि अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करणार आहे.

प्रस्तावक आणि अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्यांसह त्यांच्या उमेदवारी अर्जांच्या अनेक प्रती सज्ज ठेवण्यात येत आहेत. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात निवडणुकीची प्रक्रिया पार पडेल. भाजपशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि महत्त्वाच्या नेत्यांना १९ ते २२ जानेवारीदरम्यान दिल्लीत उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, नितीन नबीन यांची मागील महिन्यांतच कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यामुळे तेच राष्ट्रीय अध्यक्ष असतील, अशी चर्चा होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. नितीन नबीन हे बिहार सरकारमध्ये मंत्री असून आतापर्यंत पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पक्षसंघटनेचा दांडगा अनुभव असलेला तरूण नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांच्या रूपाने पहिल्यांदाच पक्षाला तरूण अध्यक्ष मिळणार असल्याने या निवडीला महत्व प्राप्त झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT