PM Modi Office : 78 वर्षांनंतर PMOचा पत्ता बदलणार! साऊथ ब्लॉक सोडून मोदी 'या' आलिशान वास्तूत होणार शिफ्ट! काय आहे वैशिष्ट्य!

Seva Teerth PM Modi address : 78 वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्यालय साऊथ ब्लॉकमधून नव्या पीएमओ वास्तूत स्थलांतरित होणार आहे. जाणून घ्या वैशिष्ट्ये.
PM Modi shifting from South Block
PM Modi shifting from South BlockSarkarnama
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाचा पत्ता लवकरच बदलणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. जवळपास 78 वर्षांपासून पंतप्रधान कार्यालय साउथ ब्लॉकमध्ये कार्यरत होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळापासून आजपर्यंत देशातील सर्व पंतप्रधानांनी याच साउथ ब्लॉकमधून कारभार पाहिला. मात्र आता ही परंपरा बदलण्याच्या मार्गावर आहे.

पंतप्रधान कार्यालय साउथ ब्लॉकमधून हलवून नव्याने उभारण्यात आलेल्या ‘सेवा तीर्थ’ या संकुलात स्थलांतरित होणार आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी सरकारी सूत्रांकडून यासंदर्भात संकेत दिले जात आहेत. सध्या तारीख निश्चित नसली, तरी काही अहवालांनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी मकर संक्रांतीच्या दिवशी, म्हणजेच 14 जानेवारी रोजी नव्या कार्यालयात काम सुरू करू शकतात.

PM Modi shifting from South Block
Sanjana Jadhav News : रावसाहेब दानवेंची आमदार कन्या, कट्टर राजकीय विरोधकाच्या मुलीच्या प्रचाराला!

सेवा तीर्थ हे संकुल दिल्लीतील दारा शिकोह रोड परिसरात असून ते सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या संकुलात केवळ पंतप्रधान कार्यालयच नव्हे, तर कॅबिनेट सचिवालय आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय, म्हणजेच NSCS देखील असणार आहे. विशेष बाब म्हणजे या तिन्ही संस्थांसाठी स्वतंत्र इमारती उभारण्यात आल्या आहेत, जेणेकरून प्रशासन अधिक सुटसुटीत आणि कार्यक्षम होईल.

सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, कॅबिनेट सचिवालय गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातच सेवा तीर्थ संकुलात स्थलांतरित झाले आहे. यापूर्वी हे सचिवालय राष्ट्रपती भवन परिसरातून कार्यरत होते. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय सध्या सरदार पटेल भवनातून चालते, मात्र लवकरच तेही सेवा तीर्थमध्ये येण्याची शक्यता आहे. या सगळ्या हालचाली पाहता, पंतप्रधान कार्यालयाचे स्थलांतर आता अंतिम टप्प्यात असल्याचे मानले जात आहे.

नव्या पंतप्रधान कार्यालयाच्या इमारतीत अत्याधुनिक सुविधा असणार असल्याचे सांगितले जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षा यंत्रणा, प्रशस्त बैठक व्यवस्था आणि कार्यक्षम कार्यालयीन रचना यावर विशेष भर देण्यात आला आहे. या संकुलाचे बांधकाम लार्सन अँड टुब्रो या नामांकित कंपनीने केले असून, 2022 साली या प्रकल्पाचा ठेका कंपनीला देण्यात आला होता.

पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात अनेक ठिकाणांची नावे बदलण्यात आली आहेत, ज्यामागे सांस्कृतिक आणि प्रतिकात्मक अर्थ दडलेला आहे. 2016 साली ‘रेस कोर्स रोड’ या पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे नाव बदलून ‘लोक कल्याण मार्ग’ करण्यात आले. त्यानंतर दिल्लीतील ऐतिहासिक ‘राजपथ’चे नाव ‘कर्तव्य पथ’ ठेवण्यात आले. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या नव्या केंद्रीय सचिवालयांच्या इमारतींनाही ‘कर्तव्य भवन’ असे नाव देण्यात आले आहे.

PM Modi shifting from South Block
Women Welfare Scheme : लाडक्या बहिणींना सुगीचे दिवस, रोजंदारीसह योजनेची लक्ष्मी प्रसन्न होणार

आता पंतप्रधान कार्यालयाचे ‘सेवा तीर्थ’मध्ये स्थलांतर होणे हे देखील याच विचारसरणीचा भाग मानले जात आहे. सेवा, कर्तव्य आणि लोककल्याण या मूल्यांना अधोरेखित करणारा हा बदल केवळ पत्त्यापुरता मर्यादित नसून, नव्या प्रशासनिक दृष्टिकोनाचे प्रतीक असल्याचे अनेकांचे मत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com