BJP News : पुढील वर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. फेब्रुवारीमध्ये उत्तर प्रदेशची निवडणूक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी ही निवडणूक सहज जिंकूण तिसऱ्यांदा सत्ता मिळवतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये समाजवादी पक्ष देखील मजबूत दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते मोठा निर्णय घेण्याच्या तयारी आहेत.
'हिंदुस्थान' या हिंदी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, भाजप २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या रणनीतीमध्ये बदल करत आहेय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीसाठी विधान परिषदेच्या बहुतांश विद्यमान आमदारांना तिकीट देण्यात येणार आहे. या आमदारांना निवडणूक लढावी लागणार आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विधान परिषदेच्या आमदारांना त्यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या भागातील विधानसभा मतदारसंघामध्ये काम करण्यास सुरुवात करण्यास सांगितले आहे. भाजपच्या या संभाव्य निर्णयामुळे उत्तर प्रदेशातील अनेक प्रमुख मंत्री आणि संघटनेमध्ये काम करणाऱ्या मोठ्या नेत्यांना विधानसभा निवडणूक लढावी लागणार आहेय
विधान परिषदेचे आमदार असलेले मंत्री, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, वरिष्ठ कॅबिनेट मंत्री ए.के. शर्मा, जलविद्युत मंत्री स्वतंत्र देव सिंह, मंत्री दारा सिंह चौहान यांच्यासह माजी प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी यांना विधानसभा निवडणूक लढावी लागणार आहे.
पक्षाच्या नेतृत्वाला विश्वास आहे की, या अनुभवी नेत्यांना थेट निवडणुकीच्या रिंगणात आणल्याने राज्यातील पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थकांचा उत्साह दुप्पट होईल आणि त्या भागांमध्ये भाजपची स्थिती मजबूत होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.